मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. याच संतापाचा फटका मंत्री धनंजय मुंडे यांना बसला आहे. हे प्रकरण उजेडाच येण्याधी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र पाकलमंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचे नाव नसून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खुद्द त्यांच्याकडेच ठेवून घेतलं आहे. 

अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय

राज्य सरकारने नुकतेच राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. एकीकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे यांच्याकडेच येईल, असा कयास लावला जात होता. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा त्यांना फटका बसला आहे. पालकमंत्रिपदाच्या यादीतून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. आता बीड जिल्ह्याचा कारभार स्वत: अजित पवार  पाहणार आहेत. त्यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवलंय. तसेच बीड जिल्ह्यासोबतच ते पुणे जिल्ह्याचेही पालकमंत्री असणार आहेत.    

पंकजा मुंडेंकडे जालना जिल्हा

संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याचा कारभार अजित पवार यांनी स्वत:कडे घ्यावा तसेच येथील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न हाताळावा, अशी मागणी केली जात होती. नागरिकांची हीच भावना लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांना वगळून अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवलंय. धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यास ही जबाबदारी पंकजा मुंडे यांना दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात होते. मात्र त्यांना देखील बीड जिल्ह्याऐवजी जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.  

सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी 

1. गडचिरोली - देवेंद्र फडणवीस 2. ठाणे - एकनाथ शिंदे 3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे 4. पुणे - अजित पवार 5. बीड - अजित पवार 6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे 7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील9. वाशिम - हसन मुश्रीफ10. सांगली - चंद्रकांत पाटील11. नाशिक - गिरीश महाजन12. पालघर - गणेश नाईक13. जळगाव -गुलाबराव पाटील14. यवतमाळ - संजय राठोड15. मुंबई उपनगर - आशिष शेलार  तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा 16. रत्नागिरी - उदय सामंत 17. धुळे - जयकुमार रावल18. जालना - पंकजा मुंडे19. नांदेड - अतुल सावे20. चंद्रपूर - अशोक उईके 21.सातारा - शंभूराज देसाई22. रायगड - आदिती तटकरे23.लातूर - शिवेंद्रराजे भोसले 24. नंदूरबार - माणिकराव कोकाटे25.सोलापूर - जयकुमार गोरे26. हिंगोली - नरहरी झिरवाळ27. भंडारा - संजय सावकारे28. छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट29. धाराशिव - प्रताप सरनाईक30. बुलढाणा - मकरंद जाधव31. सिंधुदुर्ग - नितेश राणे 32. अकोला - आकाश फुंडकर 33. गोंदिया -बाबासाहेब पाटील 34. कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ35. वर्धा - पंकज भोयर 36.परभणी - मेघना बोर्डिकर

हेही वाचा :

Maharashtra Guardian Ministers List : पालकमंत्र्यांची यादी जाहीर, बीड आणि पुण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? संपूर्ण यादी