एक्स्प्लोर

Horoscope Today 18 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 18 July 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 18 July 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 18 जुलै 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनिदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमाच्या बाबतीत अहंकार बाळगू नका. तसेच, आजच्या दिवसात कोणताही नवीन निर्णय घेताना सावधानता बाळगा. घराच्या आसपास गाय दिसली तर दान करायला विसरू नका. तुमच्यासाठी लवकर चांगली बातमी आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच नवीन प्रोजेक्ट हाती लागेल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल आणि जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा द्याल. व्यवसायात एखादा करार होऊ शकतो. तसेच, संपत्तीचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. मुलांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. काही महत्त्वाची कामे आज वेळेत पूर्ण होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्यापाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा असताना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन सुखाचे जातील. आज संध्याकाळच्या वेळी पार्टनरला छान भेटवस्तू द्याल. तसेच, तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही दिग्गज लोकांची मदत मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागेल. या दरम्यान अनेक लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस थांबून होता ते काम तुमचं वेळेत पूर्ण होईल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, सामाजत तुमच्या नावाचं कौतुक केलं जाईल. प्रगतीचे अनेक संकेत निर्माण होणार आहेत.  

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. पण, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याने अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे व्यवहारात फक्त स्वत:चाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईल. मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. भविष्यात तुम्ही प्लॅन केलेल्या योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमचा आत्मविश्वासही ढासळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या हाती चांगली बातमी लागेल. लवकरच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. प्रवासाचे योग आहे. फक्त आळस दूर ठेवा. यश तुमचंच आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :                                                                             

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा गेमचेंजर; 'या' 5 राशींना लागणार जॅकपॉट, साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget