Horoscope Today 18 July 2024 : पंचांगानुसार, आज 18 जुलै 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


महिलांना कौटुंबिक स्तरावर बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील. एकावेळी अनेक कामे करू नयेत. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


वैयक्तिक जीवनात लाभ मिळण्यासाठी उत्तम दिवस. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन रोखठोक स्पष्ट आणि निर्भय असेल.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


एखादी कृती करण्यासाठी कितीही मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी त्यावर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळेल.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


चांगल्या वागण्या बोलण्यामुळे आज तुमचा फायदा होणार आहे त्यामुळे बरेच प्रसंग सुसह्य होतील. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


तुमची बुद्धी आणि हुशारी वापरून अनेक कामांचा कायापालट करून टाकाल. हाताखालच्या लोकांना समजून घ्यावे लागेल. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


लोकांमध्ये अवगुण शोधून त्यांच्यावर टीका करून आज काहीही साध्य होणार नाही. महिलांनी जास्तीत जास्त सकारात्मक विचार करावा.


तुळ रास (Libra Horoscope Today)


तुमची ज्या कामांमध्ये गैरसोय झालेली होती त्यात सुधारणा होईल. एका वेळी अनेक कामे करू नयेत. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


ज्या कामांमध्ये फायदा आहे त्या कामांमध्ये एकाग्रता वाढवा. तुमच्या औदार्याला सीमा राहणार नाही.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वाचा आज तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला बराच लोक समुदाय वावरेल.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आपले वर्चस्व कायम राहिले पाहिजे हा अट्टाहास आज तुमचा राहणार आहे. महिलांचा धार्मिक ते कडे कल राहील.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


आज अनेक संधी येतील त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. महिला लहरी बनतील. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


आज विचारांपेक्षा कृतीला जास्त महत्त्व द्या. एखाद्या गोष्टीचा सर्वांगाने विचार करावा लागेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117      


Chanakya Niti : आयुष्यात कधीच पराभव होणार नाही, वाघाकडून शिका 'या' बहुमूल्य गोष्टी; यशस्वी जीवनाचा मूलमंत्र चाणक्य सांगतात...