Horoscope Today 17 August 2024 : पंचांगानुसार, आज 17 ऑगस्ट 2024, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


व्यवसायात बारकाईने सर्व गोष्टींचे निरीक्षण करून निर्णय घ्यायला लागतील. सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल. घरामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांची योग्य सांगड घालावी लागेल.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


विद्यार्थ्यांनी इतर ठिकाणी जास्त लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


सुसंधीचे सोनेरी क्षण वेचायला तुमची बुद्धी सक्षम असल्यामुळे तुम्ही कशाचीच पर्वा करणार नाही.


सिंह रास (Leo Horoscope Today)


कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल. वरिष्ठांचा सल्ला देखील तुमच्यासाठी फार मार्गदर्शक ठरेल. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


कोर्ट कचेरी बाबत चालणारे खटले थोडेसे रंगातील. कुटुंबातील व्यक्तींच्या वागण्यामुळे थोडा मनस्ताप संभवतो. 


तुळ रास (Libra Horoscope Today)


पूर्वी ज्या गोष्टी करण्याचे तुम्ही टाळत होतात त्याच गोष्टी करण्याकडे तुम्ही पुन्हा उत्सुक व्हाल.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


तुमच्या व्यवहारी स्वभावामुळे ज्या गोष्टींमुळे लाभ मिळतो ती गोष्ट तुम्ही करालंच. एकाग्रता गरजेची आहे. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


काम करण्यासाठी पडलेले कष्ट तुम्ही चिकाटीने पेलाल. अशावेळी तुमच्या बुद्धीला शांत विचारीपणाची झालं असेल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


व्यापारात नफा मिळण्यासाठी धोरणीपणा उत्तम उपयोगी पडेल. कामचलाऊ गोष्टी करण्याची शक्यता आहे. 


कुंभ रास  (Aquarius Horoscope Today)


कोणतेही काम करताना साधक बाधक विचार करून पावले टाकाल. महिला कामाचे उत्तम नियोजन करतील. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


स्वतःसाठी काम करण्याऐवजी दुसऱ्यासाठी काम करावे लागेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल. 


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                   


हेही वाचा:


Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांमध्ये जन्मत:च IAS आणि IPS होण्याचे दिसतात 'हे' गुण; आपल्या कर्तृत्वावर हवं ते करतात साध्य