Vinesh Phogat Appeal Rejected नवी दिल्ली: भारताची पैलवान विनेश फोगाटनं रौप्य पदकाची याचिका फेटाळल्यानंतर आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे घडलं त्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपूर्वी नियमापेक्षा अधिक वजन नोंदवलं गेल्यानंतर विनेश फोगाटला निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी विनेश फोगाटनं कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली होती. अखेर या सर्व प्रकरणानंतर विनेश फोगाटनं सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलं आहे. यामध्ये तिनं भावना व्यक्त केल्या आहेत.  


विनेश फोगाटच्या पत्रात काय?
विनेश फोगाटनं लहान खेड्यातील मुलगी असल्यानं ऑलिम्पिक काय असतं हे माहिती नव्हतं. लहान मुलगी असताना लांब केस असावेत असं स्वप्न असतं. मोठं झाल्यानंतर प्रत्येक तरुणीचं हातात मोबाईल असणं याशिवाय इतर गोष्टी करणं असं स्वप्न असतं. माझे वडील बस चालक होते, ते म्हणायचे, माझ्या मुलीनं विमानातून प्रवास करावा त्यावेळी मी रस्त्यावर गाडी चालवत असावं. माझ्या वडिलांचं स्वप्न मी सत्यात उतरवलं. सर्वात लहान असल्यानं वडिलांची लाडकी होते, असं विनेशनं म्हटलं. आईनं तिच्या मुलींनी तिनं जे आयुष्य जगलं त्याच्या पेक्षा चांगलं आयुष्य जगण्यासाठी संघर्ष केला, असंही विनेश म्हणाली. वडिलांच्या निधनानंतर तीन महिन्यातच आईला कॅन्सर झाल्याचा उल्लेख विनेशनं केला आहे.आईनं केलेला संघर्ष, कधीच हार मानायची नाही ही वृत्ती, लढाऊ बाणा यामुळं मी घडले, असं ती म्हणाली. जे तुझं असेल त्यासाठी संघर्ष करं हे आईनं शिकवलं. जेव्हा धाडस करायचं असतं तेव्हा आईच्या धाडसीपणाचा विचार करते, असं विनेश फोगाटनं म्हटलं. 


विनेश फोगाटचं ट्विट:







विनेश फोगाटनं तिचा पती सोमवीर याबद्दल देखील पत्रात भावना व्यक्त केल्या आहेत.डॉ. दिनेश पार्दीवाला, डॉ. वायने पॅट्रिक लोम्बार्ड, वोल्कर अकोस, अश्विनी जीवन पाटील,तजिंदर कौर, मुग्धा बर्वे, यतिन भटकर, विरेन सर, मयंक सिंग गरिया, गगन नारंग यांच्यासह अनेकांचा विनेश फोगाटनं उल्लेख केला आहे.  


विनेश फोगाटनं राष्ट्रकूल स्पर्धेत तीन सुवर्णपदकं जिंकली आहेत. आशियाई स्पर्धेत एकदा सुवर्ण आणि कांस्य पदकावर विनेशनं नाव कोरलं आहे. 


संबंधित बातम्या :


सीएएसने विनेशबाबतचा निर्णय पुढे ढकलल्याने महावीर फोगाट संतापले; रौप्य पदकावर म्हणाले...


Vinesh Phogat : CAS च्या निकालाबाबत तारीख पे तारीख सुरु, विनेश फोगाटच्या याचिकेवर निकाल कधी येणार? नवी माहिती समोर