Numerology : खरंतर, आयुष्यात आपणही लाल दिव्याच्या गाडीने फिरावं, सरकारी नोकरी (Government Job) मिळावी, उच्च पदावर काम करावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यानुसार, अनेकजण आएएस, आयपीएस (IAS/IPS) ऑफिसरची तयारी करतात. त्यासाठी हवा तितका अभ्यासही करतात. मात्र, यापैकी काही जणांच्याच आयुष्यातलं हे स्वप्न पूर्ण होतं. 


ज्योतिष शास्त्रानुसार, अंकशास्त्र हे, तुमचं भविष्य घडविण्यासाठी, तुमचा कल ठरविण्यासाठी तुमची मदत करु शकतात. यामध्ये तुमच्या जन्मतारखेनुसार, तुमच्या करिअरची आवड आणि मार्ग नेमका कोणता असेल हे ठरवता येऊ शकतं. अशाच काही मूलांकाविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


मूलांक 1 


ज्या जन्मतारखेच्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 1 असतो. आयएएस आणि आयपीएसच्या दृष्टीने पाहिल्यास, मूलांक 1 च्या लोकांमध्ये लीडरशिप क्वालिटी, महत्त्वाकांक्षा आणि स्वतंत्र विचाराची क्षमता जास्त असते. या जन्मतारखेच्या लोकांमध्ये लीडरशीप क्वालिटी असल्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता यांच्यात जन्मत:च असते. त्यामुळे ज्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता असते त्या ठिकाणी या मूलांकाचे लोक अगदी सहज काम करु शकतात. 


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13 आणि 22 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. या जन्मतारखेचे लोक फार शिस्तप्रिय असतात. मेहनत, शिस्त आणि व्यहारिकता यांच्या रक्तातच असल्यामुळे या जन्मतारखेच्या लोकांसाठी अधिकारी पदाची नोकरी योग्य असते. एक अधिकारी पदावर रुजू होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीत हे गुण असणं फार गरजेचं असतं. 


मूलांक 8 


कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. या जन्मतारखेचे लोक हे फार हुशार असतात. तसेच, 8 हा शनीचा देखील अंक असल्यामुळे या जन्मतारखेचे लोक अधिकार, शक्ती आणि क्षमतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे हे लोक या पदावर रुजू होऊ शकतात. 


मूलांक 9 


कोणत्याही महिन्याच्या 9,18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. या लोकांमध्ये करुणा, मानवतावादी आणि आदर्शवादी असे भाव असतात. समाजात बदल घडवून आणण्यासाठी हे लोक सक्षम असतात. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक देखील सरकारी नोकरी सहज करु शकतात किंवा त्यांच्यात ती क्षमता असते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Shani Dev : 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत होणार शनी मार्गी, 'या' 3 राशींच्या नशिबाला लागणार चार चॉंद, प्रगतीसह धनलाभाचेही योग