एक्स्प्लोर

Horoscope Today 17 August 2023 : मिथुन, सिंह, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 17 August 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 17 August 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज, ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल, कर्क राशीच्या लोकांचे काही कारणास्तव जास्त पैसे खर्च होऊ शकतात. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच काम सुरू करा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. कुटुंबातील कोणत्याही प्रकारच्या मतभेदांपासून दूर राहा. छोटा वाद मोठ्या भांडणाचे रूप घेऊ शकते. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नोकरदारांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. आज तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूष होतील आणि तुमच्या कामाचे कौतुकही करतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला खूप दिवसांपासून एखादे नवीन काम सुरू करायचे असेल, तर आज तुम्ही ते काम सुरू करू शकता.आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला जाईल. तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि तुम्हाला नवीन ऑफर मिळतील ज्यातून तुम्हाला नफा मिळेल. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मुलाच्या बाजूनेही तुमचे मन समाधानी राहील.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचा संपूर्ण दिवस काही धार्मिक कार्यात जाईल. ज्यामध्ये तुम्ही खूप व्यस्त असाल. संध्याकाळी तुमचे मन आध्यात्मिक गोष्टींकडे वळेल. व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात एखादी चांगली ऑफर मिळू शकते. ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल. एखाद्या खास व्यक्तीच्या भेटीमुळे तुमच्या व्यवसायात खूप प्रगती होईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात नवी दिशा मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरीत बढतीची संधी मिळू शकते.  

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. ज्या कामात तुम्ही जास्त मेहनत कराल, त्या कामात तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल. तुमचा आर्थिक खर्च वाढेल. काही घरगुती कामासाठी तुमचे पैसे व्यर्थ खर्च होऊ शकतात. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी अडचणींचा असेल, तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. राजकारणात चांगली संधी आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अपेक्षित नफा मिळेल. कार्यक्षेत्रात काही काम अडकल्यामुळे आज संध्याकाळचा तुमचा मौल्यवान वेळ वाया जाऊ शकतो. थोडेसे प्रयत्न केल्यास हा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्वात खास दिवसांपैकी एक ठरू शकतो.आज काही सामाजिक कार्यात भागीदारी करून तुम्हाला बरे वाटेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तसेच जोडीदाराचे सहकार्य मिळेल. तुम्ही मुलांसोबत वेळ घालवा, त्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. काही लोकांसाठी, कुटुंबात नवीन व्यक्तीचे आगमन उत्सव आणि आनंदाचे क्षण घेऊन येईल. तुमचे प्रेम जीवन काही विशेष असणार नाही. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी बोलताना आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा.

तूळ

तूळ राशीच्या  लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळेल. तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. भांडण करणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. हुशारीने वागा. आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात तुम्हाला हळूहळू यश मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नातेवाईकांचेही सहकार्य मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत कराल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे समाजसेवेचे काम करत आहेत, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वांना खूप आनंद होईल. शेजारच्या वादात अडकणे टाळा. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. विद्यार्थी अभ्यासात कमी लक्ष देतील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतात. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांनी अधिक मेहनत करण्याची गरज आहे, तरच यश मिळेल.

धनु

धनु राशीच्या लोकांना आज अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यांच्या करिअरमध्ये नाव कमावण्याची संधीही मिळेल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या तब्येतीत चढ-उतार जाणवतील, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल. अशा वेळी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित काम तुमची जागरूकता वाढवेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हा काळ कठीण आहे. तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आईचा सहवास मिळेल. वडिलांच्या माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आधीच्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. प्रॉपर्टीचे व्यवहार करणाऱ्या लोकांना उद्या चांगला व्यवहार होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला स्वतःला खूप उत्साही वाटेल. आज तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकता. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुम्ही यापूर्वी केलेली गुंतवणूक पूर्ण लाभदायक ठरेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. परदेशातून शिक्षण घेण्याची संधीही मिळेल. आज तुमच्या दिवसाची सुरुवात थोडी दमछाक करणारी असेल, पण जसजसा दिवस पुढे जाईल तसतसे तुम्हाला चांगले वाटेल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळेल या वेळेत तुम्ही तुमच्या आवडीची कामं करू शकता. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, ज्यामुळे ते व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. आज तुम्ही कोणताही विचार करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण नकळत तुमच्या वृत्तीमुळे कोणाच्या तरी भावना दुखावू शकतात. आज तुम्ही तुमचे पैसे धार्मिक कार्यात गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळण्याची शक्यता आहे. आज जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तर तुम्ही या वेळेचा उपयोग ध्यान आणि योगासने करण्यासाठी करू शकता. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

मीन

मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस समाधानकारक असेल. घरात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य सहकार्य करताना दिसतील. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. आज तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. जर तुम्हाला घर, फ्लॅट खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 16 August 2023 : वृषभ, कुंभसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! बुधादित्य राजयोग - चंद्रग्रहणाचा पॉवरफुल योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! बुधादित्य राजयोग - चंद्रग्रहणाचा पॉवरफुल योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Horoscope Today 23 August 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली; सूर्यदेवाच्या कृपेने दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली; सूर्यदेवाच्या कृपेने दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 23 August 2026 : आजचा रविवार 'या' 8 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 8 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget