Horoscope Today 16 June 2024 : पंचांगानुसार, आज 16 जून 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आजचा तुमचा दिवस आनंदी आणि उत्साही असेल. शांत वृत्तीने दिवस जाईल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. 


वृषभ (Taurus Horoscope Today)


तुमच्या विनयशील आणि सुसंस्कृत स्वभावाचे दर्शन इतरांना घडेल. महिलांना सर्वांचे सहकार्य उत्तम राहील.


मिथुन (Gemini Horoscope Today)


मित्र परिवाराच्या गाठीभेटी होऊन नवीन मित्रपरिवार वाढेल. महिला पैशाच्या बाबतीत नशीबवान ठरतील. 


कर्क (Cancer Horoscope Today)


एखादी गोष्ट सतत आणि सातत्याने करणे तुम्हाला आज अवघड जाईल. परंतु नशिबाची चांगली साथ मिळेल. 


सिंह (Leo Horoscope Today)


ध्यानीमनी नसताना नोकरी-व्यवसायात फायदेशीर घटना घडतील. प्रसिद्धीच्या झोतात याल. 


कन्या (Virgo Horoscope Today)


अनेक गोष्टींसाठी खर्च करावा लागेल. नवीन घर घेण्याच्या शोधात असणाऱ्यांना अजून थोडा धीर धरणं आवश्यक आहे.


तूळ (Libra Horoscope Today)


विवाह करण्याची इच्छा असणाऱ्यांचे विवाह जमतील. अविवाहित आपल्यासाठी योग्य जोडीदार निवडतील.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


कलाकारांनी आपली कला सादर केल्यास प्रसिद्धी मिळेल. काही अचानक संधी चालून येतील. 


धनु (Sagittarius Horoscope Today)


जोडीदाराच्या धाडसाचे कौतुक वाटेल आणि त्याला पूर्ण सहकार्य दिले जाईल. महिला थोड्या लहरी बनतील. 


मकर (Capricorn Horoscope Today)


नोकरी व्यवसायात अनेक कामे सहजगत्या होतील. योगायोगांचा अनुभव घ्याल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


विशेष त्रास न पडता कामं पूर्ण होतील. प्रकृतीमान चांगलं राहील. 


मीन (Pisces Horoscope Today)


आनंदी राहाल. आत्तापर्यंत केलेल्या उपासनेचे बळ मिळाल्यामुळे समाधान मिळेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक