Vishal Patil on Majha Katta : "उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) 40 आमदार सोडून गेले. आमदारांना विचारलं की, ते सांगतात उद्धव ठाकरे भेटतच नव्हते. आमच्याशी त्यांचा संपर्क नव्हता. अशी तक्रार असताना एखादा व्यक्ती मुंबईत पोहोचतो. उद्धवजींना भेटतो. उमेदवारी जाहीर करुन येतो. एवढ्यापर्यंत पोहोचतो. असं कोणाची सहजासहजी भेट होत नाही. आमदारांची भेट होतं नाही, अन् पैलवान भेटून येतो. त्यामुळे लोकांना संशय येणे स्वाभाविक आहे", असं सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते विश्वजीत कदमही (Vishwajeet Kadam) उपस्थित होते.
काँग्रेसकडून प्रयत्न करणे हेच नैसर्गिक होते
विशाल पाटील म्हणाले, सागंलीतील लोक संशय घेऊ लागले. आमदार, खासदार पोहोचू शकत नाहीत. एक पैलवान मातोश्रीवर कसा पोहोचला, अशा व्यक्तीला सहजासहजी कसे भेटले, अशी चर्चा होऊ लागली होती. ते कोणत्या कारणासाठी भेटले होते. मलाही माहिती नाही. बाहेर चर्चा होत होत्या की, आम्ही उद्धवजींना का भेटत नाही. पवार साहेबांना का भेटत नाहीत. पण आम्ही काँग्रेसमध्ये होतो. त्यामुळे काँग्रेसकडून प्रयत्न करणे हेच नैसर्गिक होते, असंही विशाल पाटील यांनी सांगितलं.
आम्हाला कोठेही महाविकास आघाडी धर्म मोडायचा नव्हता
विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) म्हणाले, स्वाभिकरित्या चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली. आमचा विषय वेगळाच सुरु होता. आम्हाला कोठेही महाविकास आघाडी धर्म मोडायचा नव्हता. त्यामुळे आम्ही लढत राहिलो. प्रत्येकाला भेटेल त्याला आम्ही सांगत होतो. शिवसेनाला, महाविकास आघाडीला सांगत होतो की, ही सीट आम्हाला द्या. आम्ही लढतो आणि जिंकतोही असं म्हणालो.
प्रवेश घेतला आणि अवघ्या सहा दिवसांत चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली
चंद्रहार पाटील कट्टर शिवसैनिक नव्हते. त्यांचा प्रवेश घेतला आणि अवघ्या सहा दिवसांत त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतला. आम्हाला त्याच्यावर काही बोलायचे नाही. जुन्या जखमांवर बोट लावण्यात अर्थ नसतो. आम्हाला ते करायचंही नाहीये. जेव्हा उमेदवारी जाहीर झाली. आम्ही चर्चेतून चांगला मार्ग काढू शकलो असतो, असंही विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या