एक्स्प्लोर

Horoscope Today 13 November 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 November 2026 : ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 13 November 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 13 नोव्हेंबर 2026 चा आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भक्त देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. आपल्या चुकीच्या गोष्टींबद्दल माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. लवकरच शनि वक्री होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्यातील ध्येयवादी वृत्ती दिसून येईल. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं नीट लक्ष असेल. तुमच्या कामाच्या गतीवर देखील परिणाम दिसून येईल. तसेच, जे तरुण आज जॉब इंटर्व्ह्यूसाठी जातील त्यांना सकारात्मक बदल दिसतील.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. विद्यार्थी आपल्या मेहनतीने यश कमावतील. तुमच्या वैवाहिक जीवनात छान स्थिरता दिसून येईल. एकमेकांना सपोर्ट कराल.तसेच, धार्मिक कार्यक्रमात तुमची रुची वाढलेली दिसेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

तुमच्यासाठी दिवसाची सुरुवात फार चांगली होईल. सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतायत असं तुम्हाला वाटेल. पण कामाच्या बाबतीत योग्य काळजी घ्या. तुमचे विरोधक तुमचा सूड घेण्यास तयार असतील. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या मेहनतीने तुम्हाला यश मिळेल. घरात धनसंपत्तीची भरभराट होईल. आज मित्रांबरोबर तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करु शकता. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात फार उत्तम असमार आहे. आज तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळले. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या दिवसाची सुरुवात फार अनुकूल असणार आहे. तुमच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, प्रवासाचे योग जुळून येतायत. महत्त्वाची कामे करण्यात वेळ दवडू नका. तसेच, घरातून बाहेर पडताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.

तूळ रास (Libra Horoscope)

आज तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. अनेक क्षेत्रात तुमचा वावर असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास सुखकर असेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या हळुहळू संपतील. त्यामुळे तुम्हाला फार सकारात्मक वाटेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. राजकारणी लोकांपासून दूरच राहा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुमच्या कामात थोडीशी दिरंगाई दिसून येईल. तसेच, अचानक थंडी वाढल्यामुळे तुम्हाला थोडा सर्दीचा त्रासही जाणवेल. आज महत्त्वाच्या कामांना आराम द्या. आणि कामाच्या गडबडीतून थोडा वेळ काढून विश्रांती घ्या.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या दिवसाची सुरुवात खास असेल. आज फार दिवसांनंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर छान वेळ घालवाल. घरात चांगली सुख शांती नांदेल. तसेच, लक्ष्मीच्या पावलांनी लवकरच घरात पैसा येण्याची शक्यता आहे. आज तुमच्या सिनिअर्सकडून तुम्हाला एखादी महत्त्वाची माहिती मिळेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस आदल्या दिवसापेक्षा जास्त खास असणार आहे. आज तुमच्या जवळच्या नातेवाईकांबरोबर असलेले वाद मिटतील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तुमच्या समस्या आज संपतील. तसेच, शनिदेवाच्या कृपेने लवकरच तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. घरगुती कामात तुमचं मन रमेल. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्रांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Shani Sade Sati : 2027 ते 2030 पर्यंत 'या' 2 राशींवर असणार शनिची ढैय्या; एकामागोमाग येतील संकटं, तुमची रास कोणती?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 November 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: नोव्हेंबरचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? दिवाळी संपताच दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य..
नोव्हेंबरचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? दिवाळी संपताच दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम...12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा तिसरा आठवडा गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात, साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 13 November 2026 : शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य
शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget