Astrology 13 May 2024 : ग्रहांची स्थिती पाहता, आज 13 मेचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, सोमवार, 13 मे रोजी चंद्र स्वतःच्या राशीत, म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.आज बनत असलेल्या योगांचा 5 राशींना विशेष फायदा होणार आहे. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीतरी नवीन घेऊन येईल. मेष राशीच्या लोकांना आज त्यांच्या कामात चांगलं यश मिळेल. जर तुमच्या लग्नाची चर्चा असेल तर आज तुम्हाला एक चांगलं स्थळ येऊ शकतं. तुमच्या घरात लवकरच शुभ कार्ये आयोजित केली जाऊ शकतात. आज तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी कराल. नोकरदार लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल आणि प्रत्येकजण एकमेकांना मदत करण्यास तयार असेल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कर्क राशीचे लोक आज नवीन ठिकाणांहून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, जे तुम्हाला येत्या काळात उपयोगी पडेल. चर्चेतून सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यापाऱ्यांना आज व्यवसाय क्षेत्रात नफा कमावण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला कामात चांगलं यश मिळेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला चांगले लाभ मिळतील आणि तुमच्या इच्छेनुसार खर्च करणंही तुम्हाला आवडेल. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं चांगलं राहील. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना आज खूप यश मिळेल, तुम्हाला काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल. आज तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात आणि तुम्हाला अधिक पैसे मिळू शकतात. आज तुम्हाला मालमत्तेशी संबंधित एखादी मोठी डील करण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. नोकरदार लोक आणि व्यावसायिकांना आपापल्या क्षेत्रात चांगला नफा मिळेल. प्रभावशाली लोकांशी तुमचा संपर्क वाढेल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकतं. तुमचं काम तुम्हाला नवीन ओळख निर्माण करुन देईल. व्यापाऱ्यांना आज उच्च स्तरावर नफा मिळेल आणि व्यवसायाची कामं वेळेवर पूर्ण होतील. तुमची कोणतीही केस कोर्टात चालू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. नोकरदार लोक आज सर्व कामं पूर्ण करतील आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढेल. तुम्ही तुमचे विचार कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर कराल. तुम्हाला परदेशात जाण्याचे संकेतही मिळतील.
कुंभ रास (Aquarius)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. कुंभ राशीच्या लोकांची आज चांगली कमाई होईल, पैशांची बचतही करता येईल. तुम्ही धार्मिक कामांवरही पैसे खर्च करू शकता. आज व्यावसायिक चांगलं काम करतील आणि तुम्हाला भरपूर नफा कमावण्याची संधी मिळेल. नोकरदार लोकांची कारकीर्द वेगाने प्रगतीच्या मार्गावर असेल आणि त्यांना चांगल्या उत्पन्नासह परदेशातून संधी मिळू शकतात. जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही कलह सुरू असतील तर ते आज संपतील आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला अडकलेले पैसेही परत मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: