एक्स्प्लोर

Horoscope Today 12 August 2023 : मेष, तूळ, मकरसह 'या' राशीच्या लोकांवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 12 August 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 12 August 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मीन राशीच्या लोकांना डोकेदुखी आणि पोटदुखीसारख्या आजारांनाही सामोरे जावे लागू शकते. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार नेमका कसा असेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही दिवसभर फार उत्साही असाल. धार्मिक कार्यक्रमात आज तुमचे मन गुंतेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. तुमच्या व्यवसायात संबंधित लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील, यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. तुम्हाला व्यवसायात नवीन मोठी ऑफर मिळू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचे झाले तर तुमची प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक सहकार्य मिळेल. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. आज तुमचे रखडलेले पैसे परत मिळू शकतात. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीत जास्त कामामुळे तुम्हाला तणाव जाणवू शकतो. आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना सावधगिरी बाळगा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल समाधानी असाल. जोडीदाराच्या तब्येतीबाबत तुम्हाला काळजी राहील.

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. तुम्हाला नवीन करार मिळतील, ज्यातून तुम्हाला नफा मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल पण दिलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. काही अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा. तुमच्या नम्र स्वभावाचे कौतुक होईल. बरेच लोक तुमची खूप प्रशंसा करू शकतात. आज एखादा दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज जे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. सर्व लोकांची ये-जा सुरू राहील. छोट्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल. आज दिवसभर पैशांबाबत तुम्ही चिंतेत राहाल. नवीन कौटुंबिक व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचादिवस चांगला आहे. जे लोक घरापासून दूर काम करतायत, त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखा. घरातून बाहेर पडताना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या,  तुम्हाला आर्थिक लाभ होईल. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुटुंबाच्या भल्यासाठी काम करताना दिसाल. आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. आज तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांशी शेअर करा. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतायत, त्यांना खूप फायदा होणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी दिलेली कामे पूर्ण करावी लागतील. आज तुमच्यावर काही जबाबदाऱ्याही सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. आज नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. काही कारणास्तव तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होतील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करा. मॉर्निंग वॉक, योगा यांचा तुमच्या दिनश्चर्येत समावेश करा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी देखील मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन कौटुंबिक व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या व्यवसायातील रखडलेल्या योजना तुम्ही पुन्हा सुरू करू शकाल. नोकरदार लोकांना आज नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप खूश होतील. तुमचे रखडलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जे लोक बँक आणि आयटीशी संबंधित आहेत त्यांना आज खूप फायदा होईल. छोट्या व्यावसायिकांनाही त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. ध्यान केल्याने आराम मिळेल. तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दीर्घकालीन नफ्याच्या दृष्टिकोनातून शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आज दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभ वार्ता ऐकायला मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचं सहकार्यही तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरतायत, त्यांना मित्रांच्या मदतीने चांगली नोकरी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. आज तुमचे काही नवीन संपर्क वाढतील. परंतु, दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. सरकारी कामांनाही आज गती मिळेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमचे मन प्रसन्न राहील, तुमचा कल आज श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माकडे जाईल. समाजसेवेशी निगडित विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा आज वाढेल आणि तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. तसेच, आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याचीही संधी मिळेल. 

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. सरकारी क्षेत्रांतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. घरापासून दूर काम करणाऱ्या तरुणांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. धार्मिक कार्यक्रमात कुटुंबीयांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. पैशामुळे थांबलेली तुमची कामे आज पूर्ण होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नवीन व्यवसाय सुरु करण्याची योजना आखू शकता. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जाण्याचा प्लॅन करतील, जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन वाहनाचा आनंद मिळू शकतो. आज तुम्ही शेजारच्या परिसरात होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. तुम्हाला फार प्रसन्न वाटेल.  

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्वीच्या दिवसांपेक्षा चांगला आहे. धार्मिक कार्यक्रमात तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छाही पूर्ण होईल. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. आज तुम्हाला जमीन आणि इमारतीशी संबंधित प्रकरणांमध्ये थोडा दिलासा मिळेल. क्षेत्रात काही विशेष यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील, परंतु हवामानातील बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्याची विशेष काळजी घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 11 August 2023 : मेष, सिंह, कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 October 2026: आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026 : 18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
Navratri Chinnamasta Devi 2026 : डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget