Horoscope Today 10 July 2024 : पंचांगानुसार, आज 10 जुलै 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आज हाताखालच्या लोकांवर अविश्वास दाखवू नका. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील.


वृषभ (Taurus Horoscope Today)


खूप पूर्वीपासून केलेल्या कामाच्या नियोजनाला यश लागेल. कलाकारांना वेगवेगळ्या संधी मिळतील. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


जोडीदाराचे सहकार्य उत्तम लाभेल. विवाह करू इच्छिणाऱ्यांना  हवा तसा जोडीदार लाभेल.


कर्क (Cancer Horoscope Today)


घरात मंगल कार्य ठरतील. महिलांना आपले करिअर करण्याची संधी मिळेल. 


सिंह (Leo Horoscope Today)


वैवाहिक जीवनात थोडे वादळ निर्माण होईल. अशावेळी एकमेकांनी समजूतीचे धोरण स्वीकारा.


कन्या (Virgo Horoscope Today)


आरोग्याच्या बाबतीत प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास आहे त्यांनी सावध राहावे.


तूळ (Libra Horoscope Today)


स्वतःचे काम स्वतः करण्यावर भर द्यावा. मनुष्य परिस्थितीचा गुलाम असला तरी कर्म तुमच्या हातात नक्कीच आहे.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


जेवीन तर तुपाशी, नाहीतर उपाशी ही वृत्ती आज चालणार नाही. नोकरी व्यवसायात कामाचे जेवढे नियोजन कराल तेवढे यश चांगले मिळेल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


आज तुमची चिकाटी वाखाणण्यासारखी असेल. महिलांच्या धोरणीपणाचा त्यांना फायदा होईल.


मकर (Capricorn Horoscope Today)


तुमच्या स्थिरचित्ताचा आज तुम्हाला उपयोग होणार आहे. लोकांनी केलेल्या प्रतिकाराला तुम्हाला उत्तर द्यावे लागेल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


दुसऱ्याला प्रत्युत्तर देण्यात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. समाजासमोर येऊन इतरांची मने जिंकाल. 


मीन (Pisces Horoscope Today)


आज जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. नोकरी व्यवसायात अडलेली कामे मार्गी लागतील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Numerology : प्रचंड गर्विष्ठ असतात 'या' जन्मतारखेचे लोक, स्वत:ला समजतात अतिशहाणे; दुसऱ्यांवर टीका करायला सर्वात पुढे