एक्स्प्लोर

Horoscope Today 10 January 2026 : आजचा शनिवार 7 राशींसाठी लाभदायक! शनिदेवाच्या कृपेने मिळणार कर्माचं फळ, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 January 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 10 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 10 जानेवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. हा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. त्यानुसार, भक्त आज शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करतात. उपवास धरतात तसेच, कर्माबद्दल क्षमा मागतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या कामकाजात मेहनतीवर अधिक भर द्या. तुम्हाला तुमच्या वाणीवर लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा अनेक प्रोजेक्ट्स तुमच्या हातून सुटतील. गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस सतर्कतेचा असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्या मित्रांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. आर्थिक स्थितीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, भौतिक सुख-समृद्धीचा चांगला लाभ घेता येईल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. तसेच, कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण राहील. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास करु नका. तसेच, तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या कामकाजाच्या बाबतीत तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. घरात वातावरण आनंदी राहील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच तुमच्या पद प्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. तसेच, तुमच्या व्यवसायात आज अनेक लोकांच्या संपर्कात तुम्ही याल. तुमच्या कार्याचं चागलं प्रदर्शन घडेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. मेहनतीचं फळ मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. ग्रहांची स्थिती अनुकूल असल्या कारणाने तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. तसेच, उत्पन्नाचे सोर्स वाढतील. घरातील तुमच्या आनंदी वातावरण राहील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. भौतिक परिस्थिती चांगली राहील. तुमच्या कामातून तुम्हाला समाधान मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना धनहानीचे संकेत आहेत. त्यामुळे आज कोणताही पैशांचा व्यवहार करु नका. तसेच, गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही. ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अनुकूल नसल्या कारणाने तुम्हाला त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. मात्र, आज कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला तडजोड करावी लागू शकते. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. मात्र, मनासारखा लाभ मिळणार नाही. हिरव्या वस्तू दान करणं शुभकारक ठरेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात. काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल. तसेच, हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा चांगला की वाईट? कोणत्या राशींना लागणार लॉटरी? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 6 August 2026: आजचा गुरूवार 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा गुरूवार 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget