Horoscope Today 07 July 2024 : पंचांगानुसार, आज 07 जुलै 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आज अधिकार लालसा वाढेल परंतु, त्याबरोबरच दान देण्याची वृत्तीही वाढेल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


कर्तुत्व आणि स्वावलंबन या गुणांचा उपयोग केल्यास आज यश मिळणार आहे. नेतृत्व गुण वाढेल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


तुम्ही केलेल्या कामामुळे आज लोकांमध्ये उठून  दिसाल. स्वभाव मनमोकळा राहील.


कर्क (Cancer Horoscope Today)


आज अहंकार सोडलात तर खूप पुढे जाल. स्वतःच्या अस्तित्वाला धक्का लागू देणार नाही. 


सिंह (Leo Horoscope Today)


आज उत्तम कार्यशक्ती आणि निर्णयक्षमता राहील. कोणाच्या ताटाखालचे मांजर होणे पसंत करणार नाही.


कन्या (Virgo Horoscope Today)


हम करे सो कायदा हा हेका चालवाल. पण मानापमानाच्या कल्पनांमध्ये जास्त  अडकाल.


तूळ (Libra Horoscope Today)


स्वतःकडे मोठेपणा घेण्याचा स्वभाव राहील. घरामध्ये आपलं म्हणणं इतरांना ऐकवण्यास भाग पाडाल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


हृदयविकार, पाठीच्या कण्याचे आजार असणाऱ्यांनी हलगर्जीपणा करू नये.


धनु (Sagittarius Horoscope Today)


आज धूर्त आणि व्यवहारी बनाल स्वपराक्रमाने पुढे जाल.


मकर (Capricorn Horoscope Today)


आज शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ राहाल. एखादं नवीन काम हाती घ्याल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


आज मनाचा मोकळेपणा राहील, त्यामुळे तुम्ही सर्वांना हवे हवेसे वाटाल.


मीन (Pisces Horoscope Today)


व्यवसाय नोकरीत जेवढे कष्ट कराल त्यामानाने लाभ कमी मिळणार आहे. महिला आनंदी राहतील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Rajyog : तब्बल 365 दिवसांनंतर कर्क राशीत बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' 3 राशींचं नशीब चांदीसारखं चमकणार, मोठ्या पगारवाढीसह प्रमोशनच्या संधी