Horoscope Today 05 December 2024 : आज 05 डिसेंबर गुरुवारचा दिवस आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Today Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज दिवसभर तुमचा कामाचा मूड नसेल. तुम्हाला उत्साही वाटणार नाही. मात्र, संध्याकाळच्या वेळी तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप खुश व्हाल. तुम्ही आज तुमच्या प्रॉपर्टी गुंतवणुकीबद्दल देखील विचार करु शकता. ही गुंतवणूक तुमच्यासाठी चांगली ठरेल. 


वृषभ रास (Taurus Today Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही असणार आहे. आज तुम्हाला खूप ऊर्जावान वाटेल. तसेच, आज तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. याचा तुम्ही वेळीच लाभ घ्यावा. आज तुम्हाला तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळतील. तसेच, तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याची तयारी देखील करु शकता. 


मिथुन रास (Gemini Today Horoscope)


मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. तुम्हाला आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे तुमच्या कामात अडथळा येणार नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडे तुम्ही आकर्षित व्हाल. 


कर्क रास (Cancer Today Horoscope) 


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित स्वरुपाचा असणार आहे. तुमच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या हळूहळू संपतील. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्यावर जास्त भर देण्याची गरज आहे. एखाद्या नवीन गोष्टीत तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता. 


सिंह रास (Leo Today Horoscope) 


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून थांबलेले काम पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. लवकरच तुमच्या घरात मंगलमय कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं. 


कन्या रास (Virgo Today Horoscope) 


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळू शकते. तसेच, जर तुम्ही कोणाला पैसे दिले असतील तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. 


तूळ रास (Libra Today Horoscope) 


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. जर तुम्हाला नवीन घर, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, विद्यार्यांकडून तुम्हाला चांगली माहिती मिळेल. 


वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी सुरु असतील. यामध्ये तुम्ही गुंतत जाल. तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळणार नाही. अशा वेळी हिंमत न हारता योग आणि ध्यान करा. तुमचं मन शांत होईल. 


धनु रास (Sagittarius Today Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्यावर पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. तुमचा दिर्घकालीन आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. तसेच, जे व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरु राहील. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त असाल. त्याचबरोबर तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती स्थिर असल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चिंताजनक असेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांबाबत फार चिंतित असाल. त्यामुळे तुमचं कामात मन रमणार नाही. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होईल. तसेच, तुमचे डोळे देखील सतत दुखतील. अशा वेळी थोडा वेळ आराम करा. तसेच गणपती स्त्रोताचं पठण करा. तुम्हाला सकारात्मक वाटेल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


मीन राशीच्या लोकांच्या दिवसाची सुरुवात थोडीफार आव्हानात्मक असेल. कामाच्या ठिकाणी बॉसकडून तुम्हाला ओरडा मिळू शकतो. पण तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. सर्व सुरळीत होईल. तसेच, शारीरिक स्वास्थ्याला महत्त्व द्या. बाहेरचे तेलकड पदार्थ खाणे टाळा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 05 December 2024 : आज गुरुवारच्या दिवशी 'या' 3 राशींवर असणार दत्तगुरुंचा आशीर्वाद; वाचा आजचे राशीभविष्य