Horoscope Today 04 August 2024 : पंचांगानुसार, आज 4 ऑगस्ट 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आज थोडी संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होईल. तुमचे विचार कितीही चांगले फायदेशीर असतील तरीसुद्धा ते तुम्हाला पटवून द्यावे लागतील. 


वृषभ (Taurus Horoscope Today)


तुमच्याच मताशी लोकांनी सहमत व्हावे ही भूमिका घ्याल. मानसिक अस्थिरता आणि चंचल स्वभावाला आळा घालावा लागेल. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


नवीन विचारांचे स्वागत करण्यातच तुमचे हित दडलेले आहे. विद्यार्थ्यांनी ध्येयावर प्रेम करून कर्तव्यात तत्परता दाखवावी.


कर्क (Cancer Horoscope Today)


आज औषधोपचार वेळेवर घ्यावेत. जोडीदाराच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा त्रास होईल त्यामुळे बंड करून उठाल. 


सिंह (Leo Horoscope Today)


व्यवहारात नक्की काय काय करावे याविषयी संभ्रमावस्था निर्माण होईल. महिला कोणताही निर्णय पटकन घेऊ शकणार नाहीत. 


कन्या (Virgo Horoscope Today)


आज स्वतःचे कर्तुत्व चांगले दाखवा लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्याल.


तूळ (Libra Horoscope Today)


शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या बुद्धीवादी लोकांना वेगवेगळ्या संधी मिळतील. 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


तुमच्या क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागेल. 


धनु (Sagittarius Horoscope Today)


नोकरी व्यवसायात थोडा संघर्ष करावा लागेल. जुनी येणी वसूल न झाल्यामुळे मानसिक त्रास होईल.


मकर (Capricorn Horoscope Today)


तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध नको तेथे काम करावे लागेल. कामगारांकडून सहकार्य मिळणार नाही. 


कुंभ (Aquarius Horoscope Today)


वैवाहिक जीवनात तडजोड जास्त करावी लागेल. स्थावर मालमत्ता संबंधीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत.


मीन (Pisces Horoscope Today)


प्रेम प्रकरणांमध्ये टोकाच्या वादविवादापर्यंत जाऊ नये. महिलांना जास्त कष्ट पडल्यामुळे प्रकृती बिघडण्याचा संभव आहे


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


August Grah Gochar 2024 : ऑगस्टमध्ये त्रिग्रही राजयोगामुळे 'या' राशींचं नशीब पालटणार; कुबेराच्या आशीर्वादाने उघडणार धनाचा पिटारा