Horoscope Today 03 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
कर्क रास (Cancer Horoscope Today)
नोकरी (Job) - नोकरदार वर्गातील लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त कामाचा ताण जाणवेल. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल.
व्यापार (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज आहे.
तरूण (Youth) - शिक्षणासाठी तुम्हाला बाहेर अभ्यासासाठी जावं लागू शकतं. पण, एडमिशनसाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल.
आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य एकदम सामान्य असणार आहे. कोणत्याच प्रकारे तुम्हाला शारीरिक कष्ट करावे लागणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. तुमची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल.
व्यापार (Business) - तुमच्या व्यवसायात कोणताच नवीन बदल करू नका. तुमच्यासाठी ते चांगलं असेल.
तरूण (Youth) - तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे प्रयत्न करू पाहाल. पण मन सतत चलबिचल राहील.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असेल फक्त बाहेरच्या पदार्थांचं सेवन करू नका. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
नोकरी (Job) - तुम्हाला नोकरीत प्रमोशन हवं असल्यास तुमच्या बॉसशी संवाद साधा. तसेज, कामात जास्त मेहनत घ्या.
व्यापार (Business) - जर तुमच्या कामासंबंधित तुम्ही कोणत्या नवीन योजना आखत असाल तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.
तरूण (Youth) - तरूणांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तर बरं होईल. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदरा करा.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबाबत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. कोणत्याच प्रकारचा निष्काजीपणा करू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्रीला सुरुवात; जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त आणि अचूक पूजा विधी