Horoscope Today 03 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरी (Job) - आज तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्णपणे सक्रिय होऊन काम कराल. तुमच्या कामाप्रती असलेल्या उत्साहाला पाहून तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल.
व्यापार (Business) - आज तुमच्या कामाचा तुम्ही जास्त प्रचार करायला हवा. तरच, तुमचा व्यवसाय जोमाने पुढे नेता येईल.
तरूण (Youth) - जे तरूण युवक आहेत ते आपलं कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम असतील. तरच, तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करू शकता.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
नोकरी (Job) - आजच्या दिवशी असं कोणतंच काम करू नका ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते.
व्यापार (Business) - आज तुमची रखडलेली जी काही कामं असतील तर ती वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
तरूण (Youth) - आज तुमचे भरपूर पैसे खर्च होऊ शकतात. तुमच्या पार्टनरवर तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता. यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी फार आळस आणि थकवा येऊ शकतो. यामुळे तुमची कामं कदाचित पूर्ण होणार नाहीत.
व्यापार (Business) - आज व्यापाराच्या ठिकाणी कोणाबरोबरच उधारीचा व्यवहार करू नका. तुमचे पैसे काढून घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल.
तरूण (Youth) - आज भावा-बहिणीबरोबर तुमचे चांगले सलोख्याचे संबंध राहतील. यावेळी चुकूनही चिडचिड करू नका.
आरोग्य (Health) - आज तुम्ही डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असू शकता. सर्दी, खोकला, ताप येण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
हे ही वाचा :
Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्रीला सुरुवात; जाणून घ्या घटस्थापना मुहूर्त आणि अचूक पूजा विधी