Horoscope Today 03 July 2024 : पंचांगानुसार, आज 03 जुलै 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


इंजीनियरिंग मधील शिक्षण घेणाऱ्यांच्या अभ्यासातील प्रगतीबद्दल वरिष्ठ समाधान व्यक्त करतील. 


वृषभ (Taurus Horoscope Today)


गुड शस्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांना अनेक संधी मिळून त्यामध्ये प्रगती होईल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


आपले मत प्रदर्शित करताना न्याय बाजू समजावून घेऊन बोलणे हिताव ठरेल.


कर्क (Cancer Horoscope Today)


सत्य हे कधी ना कधी उजेडात येते, याची जाणीव ठेवून त्याप्रमाणे वर्तन ठेवलेत तर पुढच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.


सिंह (Leo Horoscope Today)


व्यवसाय, नोकरीत तुमच्या कल्पना अफलातून असतील. तुमचा आजचा दिवस लाभाचा असेल.


कन्या (Virgo Horoscope Today)


महिला आपली बौद्धिक बाजू जगासमोर मांडतील, त्यामुळे त्यांचे नवीन पैलू जगाला  दिसतील .


तूळ (Libra Horoscope Today)


परदेशगमनाचे योग संभवतात, त्यासाठी खटपट करायला आजचा दिवस चांगला आहे.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


घरामध्ये छानशी खरेदी कराल, घरात मंगल कार्य ठरल्यामुळे त्यात वेळ चांगला जाईल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


नोकरी व्यवसायात एखादे नवीन काम अंगावर पडेल परंतु त्याची उत्कृष्ट जबाबदारी पेलल्यामुळे वरिष्ठ खूश होतील 


मकर (Capricorn Horoscope Today)


थोडा अहंकार बाजूला ठेवून सर्वांमध्ये मिळून मिसळून राहिलात तर पुढच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल 


कुंभ (Aquarius Horoscope Today)


ज्यांना त्वचारोग आहे त्यांनी व्यवस्थित औषध-पाणी घ्यावं, मेंदूवर ताण येईल असं कोणतंही काम न करणं हितावह ठरेल.


मीन (Pisces Horoscope Today)


मेंदू विकार असणाऱ्यांनी जरा जास्त काळजी घ्यावी. सातत्यपूर्ण प्रयत्नांनी यश निश्चित मिळेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Numerology : अत्यंत बालिश असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; कितीही मोठ्या झाल्या तरी यांचा अल्लडपणा जात नाही, प्रत्येक गोष्ट सांगावी लागते समजावून