July 2024 Monthly Horoscope : ग्रहांच्या स्थितीनुसार, जुलै महिना हा फार लाभदायी असणार आहे. या महिन्यात अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. जुलै महिन्याची सुरुवात योगिनी एकादशीने होणार आहे, त्यामुळे हा महिना अतिशय शुभ राहील. तसेच या महिन्यात अनेक मोठे ग्रहही आपली राशी बदलणार आहेत. या काळात काही राशींचं नशीब पालटेल, तर काही राशींना थोडी काळजी घेण्याची गरज आहे. सर्व 12 राशीसाठी जुलै महिना कसा असेल? मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊया.
मेष (Aries Monthly Horoscope July 2024)
मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिना चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना त्रासदायक असू शकतो, कारण या महिन्यात व्यवसायात जास्त यश मिळण्याची आशा नाही, परंतु या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं प्रेम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जे स्वप्न बऱ्याच वर्षांपासून पाहत होतात ते आता पूर्ण होताना दिसेल. नोकरदार वर्गासाठी हा महिना लाभदायक असेल, कारण या महिन्यात तुम्ही ऑफिसमधील अनेक प्रलंबित कामं पूर्ण करून तुमच्या बॉसला प्रभावित करणार आहात. हा महिना विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळवून देईल. कौटुंबिक दृष्टिकोनातूनही हा काळ आनंदी राहील.
वृषभ (Taurus Monthly Horoscope July 2024)
वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना हा बदलाचा महिना असेल. या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मोठे बदल पाहू शकता. मोठ्या पदोन्नतीमुळे, तुम्हाला मोठी जबाबदारी म्हणजेच बॉस पद मिळू शकतं. या काळात व्यापारी वर्गाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल, कारण या महिन्यात तुम्हाला कमी नफा मिळाल्याने आर्थिक समस्यांनी तुम्ही त्रस्त होऊ शकता. भावांसोबत तुमचे वाद होऊ शकतात. अशा स्थितीत वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष लक्ष द्यावं लागेल. या महिन्यात तुमचे प्रेमसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला ग्रहांच्या संक्रमणाचे शुभ परिणाम मिळतील.
मिथुन (Gemini Monthly Horoscope July 2024)
मिथुन राशीच्या लोकांनो, या महिन्यात तुम्हाला तुमच्या नोकरीपेक्षा चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार कराल. जुलै महिना तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळाल्याने तुमच्या आनंदात भर पडेल. जुलै महिना व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पत्नी किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबासह तुम्ही बाहेर कुठेतरी फिरायला किंवा परदेशी सहलीला जाऊ शकता. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. या महिन्यात कोणताही निर्णय अहंकार दूर ठेवूनच घ्या, नाहीतर कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. या दिवसांत अतिउत्साह टाळा. अविवाहितांना या महिन्यात प्रेमाची साथ मिळू शकते.
कर्क (Cancer Monthly Horoscope July 2024)
कर्क राशीच्या लोकांसाठी जुलै महिना फायद्याचा ठरेल. या महिन्यात तुमच्या शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांमुळे नाव आणि पैसा दोन्ही मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ अतिशय शुभ राहील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ होण्याची शक्यता आहे. सिंगल लोकांना एखादी खास व्यक्ती भेटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही त्यावर मात कराल आणि पुढे जाल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. एकंदरीत तुमचा जुलै महिना चांगला जाणार आहे.
सिंह (Leo Monthly Horoscope July 2024)
सिंह राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अनेक अर्थाने चांगला असणार आहे. या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत आनंदी वेळ घालवाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत देखील चांगला वेळ घालवाल आणि कुठेतरी लांबच्या सहलीची योजना देखील कराल, हे क्षण सुखाचे असतील. नोकरदार वर्गाला या महिन्यात कामाच्या ठिकाणी फायदेशीर बदल दिसून येतील, ज्यामुळे तुमचं भविष्य चांगलं होणार आहे. विद्यार्थ्यांना या महिन्यात अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यावसायिकांना या महिन्यात व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकतं.
कन्या (Virgo Monthly Horoscope July 2024)
कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै 2024 खूप छान असणार आहे. हा महिना भविष्यासाठी खूप चांगला ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही चांगली बचत कराल, जी भविष्यात तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही लवकरच चांगली गुंतवणूक करण्याचा विचार कराल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत साहसी सहलीलाही जाऊ शकता. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला राहील. विद्यार्थ्यांनाही करिअरमध्ये यश मिळेल. वृद्धांना या महिन्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
तूळ (Libra Monthly Horoscope July 2024)
या महिन्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. या काळात अति बोलल्याने प्रेम संबंध खराब होऊ शकतात, त्यामुळे वाद टाळा. नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना जुलै महिन्यात त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि पैसेही योग्य ठिकाणी गुंतवले जातील. विवाहित लोक हा काळ चांगला घालवतील. कुटुंबात लहान मुलाचं आगमन होण्याची देखील शक्यता आहे. या महिन्यात तूळ राशीचे लोक धार्मिक कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होतील आणि दानधर्मात पैसेही खर्च करतील. या महिन्यात तुम्हाला अहंकार टाळावा लागेल.
वृश्चिक (Scorpio Monthly Horoscope July 2024)
वृश्चिक राशीचे लोक या महिन्यात त्यांच्या नेतृत्व क्षमतेमुळे कामाच्या ठिकाणी चांगलं नाव कमावतील. जुलै महिन्यात व्यवसायात तुमच्या नशिबाचे तारे चमकणार आहेत. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला अपेक्षित प्रगती आणि पदोन्नतीही मिळेल. हा महिना चांगला जाण्याची अपेक्षा आहे, कारण तुमच्या संपत्तीतही या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रशंसा, यश, सर्व काही मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये पुढे जावं. यावेळी आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
धनु (Sagittarius Monthly Horoscope July 2024)
धनु राशीच्या लोकांसाठी जुलै महिना भाग्याचा ठरेल, कारण या महिन्यात तुमचा व्यवसाय नवी उंची गाठेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसाही जमा होईल. तुम्ही नोकरी करत असाल तर या महिन्या तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. या महिन्यात धार्मिक किंवा व्यावसायिक प्रवास होण्याची शक्यता आहे, जो यशस्वी होईल. या महिन्यात तुम्हाला इच्छित यश आणि आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना करिअरच्या क्षेत्रातही चांगलं यश मिळेल. या दिवसात तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळू शकतो. एकंदरीत हा महिना खूप चांगला जाणार आहे.
मकर (Capricorn Monthly Horoscope July 2024)
मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक ठरेल. संपत्तीच्या बाबतीतही या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अचानक कुठूनतरी पैसे मिळण्याचे संकेत आहेत. यावेळी तुम्ही एखाद्याला आर्थिक मदत देखील कराल. मीडिया किंवा जनसंवादाशी संबंधित काम करणाऱ्यांना बढती मिळू शकते. या महिन्यात तुम्हाला घरात आई किंवा पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. जमीन आणि मालमत्ता खरेदीच्या बाबतीत जुलै महिना भाग्यवान ठरणार आहे. लहान मुलांपासून सावधगिरी बाळगा, कारण या दिवसात बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून त्यांचं संरक्षण करावं लागेल. या महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे संबंध दृढ बनतील.
कुंभ (Aquarius Monthly Horoscope July 2024)
कुंभ राशीच्या अविवाहितांना या महिन्यात चांगलं स्थळ येईल. नोकरदारांना पगारवाढ मिळेल आणि पदोन्नती होईल. यावेळी तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत फिरायलाही जाऊ शकता. कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायातही हा महिना यश देईल. यावेळी पालकांच्या आरोग्याची चिंता असू शकते. या महिन्यात तुम्ही काही धाडसी निर्णयही घेऊ शकता. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ फारशी लाभदायक नाही, त्यामुळे भागीदारीत मोठे आर्थिक निर्णय घेणं टाळा. रोमान्ससाठीही हा महिना चांगला म्हणता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सावधगिरी बाळगणंही खूप गरजेचं आहे.
मीन (Pisces Monthly Horoscope July 2024)
मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना लाभदायक ठरू शकतो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं भविष्यात चांगलं सिद्ध होऊ शकतं. या महिन्यात कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याचीही शक्यता निर्माण होत आहे. पार्टी, पिकनिकचा आनंदही घ्याल. या महिन्यात नक्षत्रं पैशाच्या दृष्टीने अनुकूल आहेत, परंतु तरीही सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी वर्गासाठी हा महिना अनुकूल आहे. या दिवसात वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे नातं आणखी बिघडू शकतं. त्यामुळे बोलण्याकडे लक्ष द्यावं लागेल. यावेळी नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. अविवाहितांना चांगला जोडीदार मिळण्यासही हा महिना मदत करेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :