Horoscope Today 02 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Today Horoscope)


नोकरी (Job) - आज जुलै महिन्याचा दुसरा दिवस असून हा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं कौतुक होऊ शकतं आणि सगळे तुमची तोंडभरुन प्रशंसा करू शकतात. आज तुम्ही कामावर खूप समाधानी असाल.


व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, शेतीची कामं करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे.


विद्यार्थी (Student) - आजच्या तरुणांनी थोडी धार्मिक कार्य केली पाहिजे, देवावर श्रद्धा दृढ ठेवावी, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमची सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात.


वृषभ (Taurus Today Horoscope)


नोकरी (Job) - आज तुम्ही थोडं सावध राहा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मागील कामांची यादी ठेवावी, कारण तुम्हाला त्याबाबत विचारलं जाऊ शकतं. तुम्ही तुमची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल.


विद्यार्थी (Student) - एखाद्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण तुम्हाला मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.


आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही. डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करत राहा.


मिथुन (Gemini Today Horoscope)


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामातील यश पाहून तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो, म्हणून तुम्ही तुमचा अहंकार सोडून कामात आणखी यशस्वी कामगिरी करण्याचा प्रयत्न करा.


व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.


विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक वाढवावं लागेल. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी मेहनत केली तर तुम्हाला यश मिळणार नाही. जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत वेळ घालवू शकता.


कर्क (Cancer Today Horoscope) 


नोकरी (Job) - कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित लोकांना पगारवाढीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते.


व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला तुमची मार्केटिंग टीम वाढवावी लागेल. व्यापारी आणि व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे.


विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच मेहनत सुरू करावी.


आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका.


सिंह (Leo Today Horoscope) 


नोकरी (Job) - आज तुम्हाला संघाचं नेतृत्व करण्यास सांगितलं जाऊ शकतं. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी दिलेल्या जबाबदाऱ्यांबाबत गांभीर्य ठेवावं लागेल.


व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायाची सामाजिक प्रतिमा मजबूत करण्यासाठी आपण शक्य तितक्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं. व्यावसायिक प्रवासासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल.


विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलायचं तर, एमबीए आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी वेळेवर त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देतील, तरच ते त्यांचं भविष्य चांगले घडवू शकतात. अभ्यासातील आव्हानांना घाबरू नका, त्यांना सामोरे जा.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. पण तरीही तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं चांगलं राहील. 


कन्या (Virgo Today Horoscope) 


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद आणि चर्चेपासून स्वतःला दूर राहा आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल.


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायातील स्पर्धेमुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनांच्या किमती कमी कराव्या लागतील. ग्रहांची हालचाल लक्षात घेता, प्रतिकूल परिस्थितीमुळे व्यावसायिक सौदे रखडू शकतात.


विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल सांगायचे तर, परीक्षेची तारीख अचानक जाहीर झाल्यामुळे तुमचं टेन्शन वाढेल. 


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, डिहायड्रेशनच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, यावेळी जास्त पाणी प्या.


तूळ रास (Libra Today Horoscope) 


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीच्या मालकाने सर्व कर्मचाऱ्यांकडे समान आदराने पाहिलं पाहिजे, तरच तुमचे कर्मचारी देखील तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील.


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यवसाय वाढवण्यासाठी व्यावसायिकांना पैशांची गरज भासू शकते. तुमची गरज लक्षात घेऊन तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.


विद्यार्थी (Student) - आज आपल्या भावंडांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही कठोरपणे बोलू नका. 


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहावं, तुम्हाला कधीही किंवा केव्हाही त्यांच्या सल्लामसलतीची आवश्यकता भासू शकते.  


वृश्चिक रास  (Scorpio Today Horoscope) 


नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कामावर नेहमी सत्याचं समर्थन करा.


व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्ती किंवा तज्ञाचा सल्ला घ्यावा, तरच त्यांना व्यवसायात नफा मिळू शकेल.


विद्यार्थी (Student) - आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. आज तुमचे कामही तितक्याच सहजतेने होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून पैसे घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या घरात पैशाचा वाद होऊ शकतो.


आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.


धनु रास (Sagittarius Today Horoscope)


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं.


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, सोने-चांदीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या आर्थिक ताकदीने कामात यश मिळवून खूप आनंदी राहतील.


विद्यार्थी (Student) - तुम्ही आज सहलीला जाऊ शकतात, परंतु तुम्ही प्रवासादरम्यान थोडी काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला तुमच्या सामानाचे संरक्षण स्वतः करावं लागेल, अन्यथा तुमचं सामान चोरीला जाऊ शकतं.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये. तुमच्या पाय आणि कंबरेला सूज येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप काळजीत पडू शकता.


मकर रास (Capricorn Today Horoscope)


नोकरी (Job) - जे लोक पेशाने डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. ऑपरेशन करताना काळजी घ्या. 


आरोग्य (Health) - बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तेलकट, तिखट पदार्थांचं सेवन करू नका. आणि थंड पाणी पिऊ नका. 


व्यवसाय (Business) - जे छोटे व्यावहारिक आहेत त्यांना आज व्यवसायात चांगली ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे काम करायला देखील उत्साह येईल. 


विद्यार्थी (Students) - आज विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. 


कुंभ रास (Aquarius Today Horoscope)


नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या करिअरला घेऊन थोडे गंभीर असाल. कारण वाढत्या स्पर्धेमुळे तुम्हाला तणाव होऊ शकतो. 


आरोग्य (Health) - आज तुम्हाला पोटाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पौष्टीक पदार्थांचं सेवन करा. 


व्यवसाय (Business) - ज्या ठिकाणी कोर्ट कचेरी असतील अशा व्यवसायात अडकू नका,नंतर प्रकरण तुमच्या गळ्याशी येऊ शकतं. 


युवक (Youth) - आज तरूणांनी प्रेमसंबंध सोडून इतर बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. 


मीन रास (Pisces Today Horoscope)


नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त तणावाचा सामना करावा लागेल. अनेक दिवसांपासून तुमचं रखडलेलं काम आजही पूर्ण होईल की नाही यात शंकाच आहे. 


आरोग्य (Health) - जर तुम्हाला मद्यपान, सिगारेटचं व्यसन असेल तर ते लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते. 


व्यवसाय (Business) - व्यवसायात तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमच्या कामाच्या स्वरूपात थोडाफार बदल करणं गरजेचं आहे. 


युवक (Youth) - आज तुमचा आत्मसन्मान दुखावू शकतो. त्यामुळे इतरांचं बोलणं मनावर घेऊ नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार, चौफेर धनलाभाचे संकेत