Horoscope Today 02 July 2024 : पंचांगानुसार, आज 02 जुलै 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


वडिलोपार्जित जमिनी संबंधीचे तंटे सोडवण्यात शक्ती आणि पैसा खर्च पडेल. महिलांना जरा जास्तच कष्ट पडतील. 


वृषभ (Taurus Horoscope Today)


आज कोणत्याही कामात यश मिळेल. व्यवसायात एखादी चांगली मनासारखी गोष्ट पटकन घडून जाईल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


शक्तीची आणि धाडसाची कामे करणाऱ्या लोकांना अनेक संधी मिळून जातील. आनंदी आणि खेळकर वृत्ती राहील. 


कर्क (Cancer Horoscope Today)


घरामध्ये तुमचे स्पष्ट आणि परखड विचार इतरांच्या पचनी पडणार नाहीत. महिलांना अति स्पष्टवक्तेपणा  महागात पडेल.


सिंह (Leo Horoscope Today)


एखादे काम होत आहे म्हणेपर्यंत बारगळण्याची शक्यता आहे. दैव देते आणि कर्म नेते याचा अनुभव घ्याल. 


कन्या (Virgo Horoscope Today)


कौटुंबिक जीवनात थोडे मानसिक त्रासाचे प्रसंग उदभवले तरी लवकरच त्यातून बाहेर पडाल. 


तूळ (Libra Horoscope Today)


पेराल तसे उगवतं हा विचार मनात धरून प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करणं गरजेचं आहे. महिला आपली भौतिक बाजू जगासमोर मांडतिल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


तुमचे विचार इतरांच्या गळी उतरवण्यात सफल व्हाल. फार आर्थिक उन्नती साधता आली नाही तरी सुख शांती आणि समाधान यात्रेंचा अनुभव घ्याल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


नोकरीत नवीन आव्हाने समोर आली तरी तेथे प्रचंड कष्टाची तयारी असेल तरच स्वीकारा. 


मकर (Capricorn Horoscope Today)


पूर्वीच्या राहिलेल्या कामांना गती येईल. महिलांचे नवीन पैलू जगाला दिसतील.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


लेखकांना स्फूर्ती देणारा दिवस अनेक विचार सुचतील व तते कागदावर उतरवण्याची घाई होईल.


मीन (Pisces Horoscope Today)


आज थोडा चिडचिडेपणा वाढेल. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. व्यवसाय-नोकरीत प्रगती होईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Monthly Horoscope July 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिना कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या