Holi Wishes in Marathi : दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. यंदा पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्चला आहे, त्यामुळे 24 मार्चलाच होळीचा (Holi 2024) सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छापर संदेश पाठवतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही सुंदर आणि प्रेरक शुभेच्छा संदेश (Holi 2024 Wishes in Marathi) सुचवणार आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता. तुम्ही होळीनिमित्त खालील शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि इतर सोशल मीडियावर देखील पोस्ट करू शकता किंवा स्टेटस म्हणून ठेवू शकता.
होळी शुभेच्छा संदेश (Holi Wishes In Marathi)
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी,रंगामध्ये रंगून जाण्यासाठी,होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,तुम्हाला होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
वाईटाचा होवो नाश,आयुष्यात येवो सुखाची लाटहोळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो!होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
फाल्गुन मासी येते होळीखायला मिळते पुरणाची पोळीरात्री देतात जोरात आरोळीराख लावतो आपुल्या कपाळीहोळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंद होवो OverFlowमौजमजा कधी न होवो Lowतुमची होळी साजरी होवो एकदम नंबर Oneआणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Funहोळीच्या हार्दिक शुभेच्छा!
टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंताकरू होम दु:ख, अनारोग्याचाहोळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे,रंग उधळू देद्वेष जळू दे,अवघ्या जीवनात नवे रंग भरू देहोळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच करायची तरअहंकाराची, असत्याची, अन्यायाची,जातीयतेची, धर्मवादाची,हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,गर्वाची, दु:खाची होळी कराहोळीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गोड क्षण आणिदीर्घकाळ जपणाऱ्या आठवणींनी भरलेल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दहन व्हावे वादाचे, पूजावे श्रीफळ संवादाचे,नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा,आनंद घेऊन येई सण हा होळीचा,होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
मत्सर, द्वेष, मतभेद विसरूप्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरवू,अग्नीत होळीच्या नकारात्मकता जाळू रे,आली होळी आली रे!होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ईडापीडा दुःख जाळी रेआज वर्षाची होळी आली रेतुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालाहोळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी करा नकारात्मक विचारांची,होळी करा व्यसनांची,होळी करा वैर भावनेची,होळी करा वाईटाची, संगत धरा चांगल्याची,तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा: