Holi 2025 Wishes : होळीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या होळी (Holi 2025) या सणाची सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहतात. सण म्हटला की, एकमेकांना, नातेवाईकांना, मित्र-परिवाराला शुभेच्छा देणं आलंच. यासाठीच होळीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मंडळींना व्हॉट्सअप स्टेटस आणि कोट्सच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि सणाचा आनंद द्विगुणित करु शकता. 


होळी शुभेच्छा संदेश 2025 (Holi 2025 Wishes)


रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दृष्ट वृत्तीचा अंत हा झाला, 
सण आनंदे साजरा केला...
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 


होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आरोग्य व शांती नांदो...
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 


होळी पेटू दे
द्वेष, मत्सर जळू दे 
आगामी वसंत ऋतूत
तुमच्या आयुष्यात 
सुख-समृद्धीची उधळण होऊ दे!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 


रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
साजरा करु होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 


सुखाच्या रंगांनी आपले 
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नष्ट होवो!
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


 


आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 


होळी पेटू दे
रंग उधळू दे
मतभेद मिटू दे
सर्वत्र प्रेमाचा वर्षाव होऊ दे 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 


ईडापीडा दु:ख जाळी रे 
आज वर्षाची होळी आली रे 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 


खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


 


"नवयुग होळीचा संदेश नवा
आरोग्य जपा,
झाडे लावा, झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पूजा..
होळी सजवा गोव-यांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                                             


Holi 2025 Time : होलिका दहनाचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? जाणून घ्या पूजा, विधी, तिथी आणि या दिवसाचं महत्त्व