Maha Shivratri 2024: माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्री (Maha Shivratri 2024) म्हणून साजरा केला जाते. या दिवशी अनेक जण व्रत किंवा उपवास करतात (MahaShivratri 2024). यासोबतच भगवान शंकराची आराधना केली जाते. बेलाची पान आणि जलाभिषेक केला जातो. महाशिवरात्री म्हटली की कवठ आलेच. महादेवाला कवठ खूप आवडते, त्यामुळे महाशिवरात्रीला याचाच नैवेद्य दाखवला जातो. भक्तांनाही कवठ प्रसाद म्हणून दिली जाते. कवठाशिवाय महाशिवरात्री पूर्ण होतच नाही.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त शंकराची आराधना करून देवाची मनोभावे पुजा करतात. महशिवरात्रीपासून थंडी संपते आणि उन्हाळ्याची सुरुवात होते. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाला विशेष महत्त्व असते. एरवी बाजारात सहजासहजी न मिळणारे कवळ महाशिवरात्रीला आवर्जून मिळते आणि खाल्ले जाते. कवठ वसंत ऋतूत मिळणारे फळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठ फोडून त्यामध्ये कवठ घालून प्रसाद केला जातो. महाशिवरात्रीला कवठाच्या बीमध्ये अमृत उतरते अशी यामागे श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक घरत प्रसाद म्हणून कवठ दिले जाते.
कवठ खाण्याचे फायदे
- अनेकदा उन्हामुळे भूक न लागणे किंवा भूक कमी होणे अशा समस्यांना सामोरे जातो. या समस्येवर कवठ हा उत्तम उपाय आहे.
- कवठाचे फळ पचनासाठी उत्तम आणि आरोग्यवर्धक असल्याने उन्हाळ्यात कवठ खाण्याचा सल्ला दिला जातो.
- अतिसार झाल्यास कवठाचे फळ खाल्ल्याने जुलाब थांबण्यास मदत होते.
- मूळव्याध, अल्सर यासारख्या व्याधींवर कवठ हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे त्रास होत असेल तर कवळ खावे.
- ज्या लोकांना हृदयरोग किंवा छातीत धडधडते अशा लोकांनी कवठ खाणे फायद्याचे ठरते.
- उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी कवठ खाणे फायद्याचे ठरते. कवठामुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते.
- कवठामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे.
- कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते.
कधी आहे महाशिवरात्री?
8 मार्च रोजी सकाळी 9.57 पासून सुरू होईल आणि 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.17 पर्यंत चालेल. उदयतिथीनुसार 8 मार्चला महाशिवरात्री साजरी होणार आहे. यामध्ये 8 आणि 9 मार्चच्या मध्यरात्री 12.07 ते 12.55 मिनिटांपर्यंत निशीथ काल पूजा मुहूर्त असेल. दुसरीकडे, महाशिवरात्री व्रताचा पारायण मुहूर्त सकाळी 6.38 ते सकाळी 11.04 पर्यंत असेल.
हे ही वाचा :
Mahashivratri 2024: महाशिवरात्रीचा उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)