Holi 2023 Lucky Colours : हिंदू धर्मात होळी हा सण उत्सासाहात साजरा केला जातो.  यंदा होलिका दहन सण 6 मार्च 2023  रोजी आहे. तर होलिका दहनानंतर धुलिवंदन असते. धुलिवंदनाला एकमेकांना रंग लावून धुलिवंदन साजरा केला जातो. 7 मार्चला रंगांची उधळण केली जाणार आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागात होळीच्या पाच दिवसांनंतर रंगपंचमी खेळली जाते, यंदा रंगपंचमी 12 मार्चला आहे. या दिवशी लोक सर्व राग-रुसवा विसरून एकमेकांना रंग लावतात. रंगांचा हा सण आयुष्यात अनेक आनंद घेऊन येतो. होळीच्या सणाच्या दिवशी राशीनुसार रंग खेळणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया राशीनुसार कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगांचा खेळ खेळावा? ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय?



लक्ष्मी देवीची कृपा
होळीच्या दिवशी केलेल्या उपायांनी घरांमध्ये सुख-समृद्धीसोबतच लक्ष्मी देवीची कृपा राहते. होळी या पवित्र सणात राशीनुसार रंग खेळणे शुभ मानले जाते. राशीनुसार जाणून घ्या, कोणत्या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी रंगांचा खेळ खेळावा?



मेष आणि वृश्चिक
मेष आणि वृश्चिक दोन्ही राशींचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा रंग लाल असतो. म्हणूनच या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी लाल, गुलाबी रंग आणि गुलाल वापरावा.



वृषभ आणि तूळ
वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राचा रंग पांढरा आणि गुलाबी आहे. होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाने होळी खेळता येत नाही, त्यामुळे चांदीचा रंगही वापरता येतो. यासोबतच गुलाबी रंगानेही होळी खेळता येते.



कन्या आणि मिथुन
या राशींचा स्वामी बुध आहे. बुधचा रंग हिरवा मानला जातो. असे म्हटले जाते की, हिरव्या रंगाचा वापर या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती आणेल. हिरव्या व्यतिरिक्त, या राशीचे लोक पिवळ्या, केशरी आणि फिकट गुलाबी रंगांनी देखील होळी खेळू शकतात.



मकर आणि कुंभ
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेवाचा रंग काळा किंवा निळा आहे. अशा लोकांसाठी निळा रंग शुभ आहे. काळ्या रंगाने होळी खेळणे शक्य नाही, त्यामुळे निळ्या, हिरव्या किंवा नीलमणी रंगाने होळी खेळू शकता.



धनु आणि मीन
गुरु हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. त्यांचा आवडता रंग पिवळा मानला जातो. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. याशिवाय केशरी रंगही वापरता येतो.



कर्क आणि सिंह
कर्क आणि सिंह राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. आणि या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाने होळी खेळावी. पांढऱ्या रंगाने होळी खेळणे शक्य नाही, त्यामुळे हे लोक कोणताही रंग घेऊन त्यात थोडे दही किंवा दूध घालू शकतात. दुसरीकडे सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे केशरी, लाल आणि पिवळ्या रंगांनी होळी खेळता येते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Holi 2023: यंदा होळीवर भद्राची सावली? संभ्रम दूर करा, जाणून घ्या होलिका दहनाची योग्य वेळ