Holi 2023: होलिका दहन हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याची मात असल्याचे प्रतीक मानले जाते. दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. होलिका दहनाच्या दिवशी भद्राकाल नक्कीच पाळला जातो. होलिका दहनाबद्दल शास्त्रात असे म्हटले आहे की हा सण पौर्णिमेच्या रात्री साजरा करणे सर्वोत्तम आहे. शास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी जर भद्राचा प्रभाव असेल तर होलिका दहन करू नये, जाणून घ्या 2023 मध्ये होलिका दहन कधी आहे, या वर्षी होलिका दहनावर भद्राची सावली असणार की नाही? जाणून घ्या


 


2023 मध्ये होलिका दहन कधी?


फाल्गुन पौर्णिमा तिथी 6 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4.17 ते मंगळवार, 7 मार्च 2023 ते सायंकाळी 6.09 पर्यंत राहील. उदयतिथीनुसार होलिका दहन हा सण 6 मार्चलाच साजरा केला जाणार आहे. होलिका दहनासाठी पौर्णिमा तिथी सर्वोत्तम मानली जाते. शास्त्रानुसार होलिका दहन हे पौर्णिमेला भद्रा काळ वगळून करावे. विशेष स्थितीत भद्रा मुख आणि भद्रापुच्छ सोडून होलिका दहन करता येते. पण यासोबत प्रदोष काळात ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्याच दिवशी होलिका दहन करावे, अशीही मान्यता आहे. 


 


महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात होलिका दहन कधी?


पंजाब, महाराष्ट्र, जम्मू, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 6 मार्च रोजी प्रदोष कालावधीत पौर्णिमा आहे. अशा परिस्थितीत या राज्यांमध्ये 6 मार्चला होलिका दहन केले जाऊ शकते. तर पूर्व भारतात, 7 मार्च रोजी प्रदोष काळात पौर्णिमा तिथी असेल. या दिवशी भद्राकाळ नसेल. म्हणूनच होलिका दहन 7 मार्चला करणे उत्तम मानले जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहणार नाही. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये 7 मार्चला होलिका दहन आणि 8 मार्चला रंगोत्सव साजरा केला जाईल. जिथे 7 मार्चला सूर्यास्त 6.10 मिनिटांच्या आधी होईल, तिथे 7 मार्चला होलिका दहन होईल. तसेच भद्रा काळचा मुहूर्त 6 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 4.48 पासून सुरू होईल आणि 7 मार्च 2023 रोजी पहाटे 5.14 पर्यंत राहील. 


 


होलिका दहनला आपण भद्राकाळ का पाहतो?


होळीच्या पौराणिक कथेनुसार भद्रा काळात होलिका दहन अशुभ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार भद्राचे वर्णन अशुभ मानले गेले आहे. यामध्ये होलिका दहनाचा दोष आहे. असे मानले जाते की यमराज हा भद्राचा स्वामी असल्यामुळे या योगात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. तर, होलिका दहन हे भद्रा पूंछमध्ये केले जाऊ शकते, कारण यावेळी भद्राचा प्रभाव खूपच कमी असतो. होलिका दहनाच्या 8 दिवस आधी होलाष्टक सुरू होते, जो अशुभ काळ मानला जातो. पंचांग गणनेनुसार होलाष्टक सोमवार, 27 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 8 मार्च, बुधवारपर्यंत वैध असेल. धार्मिक मान्यतांनुसार होलाष्टकादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Astrology : ब्रेकअपला जबाबदार असतो पत्रिकेतील 'हा' ग्रह दोष, प्रेमसंबंधात येतो दुरावा, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या