Hindu Religion:  पृथ्वीतलावर ज्याचा जन्म झाला, त्याचा मृत्यूही अटळ आहे, आणि हे कटू सत्य आहे. या पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस जायचे आहे. म्हणून आपण नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आयुष्य जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. माणसांचं आयुष्य हळूहळू का कमी होतंय? भक्ताच्या या प्रश्नावर वृंदावनचे स्वामी प्रेमानंद महाराज यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. स्वामी प्रेमानंद जी महाराज अकाली मृत्यूबाबत काय म्हणतात आणि खरोखर असे काही घडते का? जाणून घेऊया.


व्यक्तीच्या आत्म्याला शांती कधी मिळते?


प्रेमानंद महाराजांच्या मते, जो व्यक्ती इतरांचे भले करतो आणि सदैव धर्माच्या मार्गाने जीवन जगतो, त्याचे जीवन यशस्वी होते. त्याला कधीच अकाली मरण येत नाही. जो कोणी वाईट कृत्ये करतो आणि अधर्माचे अनुसरण करतो त्याला खूप त्रास सहन करावा लागतो आणि अकाली मृत्यूला सामोरे जावे लागते. अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला कधीही शांती मिळत नाही. अशा स्थितीत प्रेमानंद महाराजांच्या मते कोणकोणत्या कृती आहेत, ज्यामुळे व्यक्तीचे आयुर्मान कमी होते आणि अकाली मृत्यू होतो.


धार्मिक ठिकाणी पाप करणे


प्रेमानंद महाराज म्हणतात की, देवाची शक्ती धार्मिक स्थळांमध्ये वास करते. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच सजावट ठेवावी. जो व्यक्ती पवित्र स्थळांना भेट देऊन पाप करतो आणि त्या स्थानांना अपवित्र करतो. अशी व्यक्ती कधीही आनंदी जीवन जगू शकत नाही. म्हणून नेहमी धर्माचा मार्ग निवडा.


सूर्यदेवाचा अपमान


प्रेमानंद महाराज म्हणतात की, सूर्याला देवाचा दर्जा दिला आहे. संपूर्ण जगाला प्रकाश देणारा सूर्यदेव माणसाच्या जीवनातील अंधार दूर करतो. त्यामुळे सूर्यदेवाची नेहमी पूजा करावी. पण जो सूर्याचा अपमान करतो आणि सूर्याकडे पाहून थुंकतो किंवा घाणेरडा काम करतो. अशा लोकांचा अकाली मृत्यू होतो.


इतरांचे हक्क हिरावून घेणे


प्रेमानंद महाराज म्हणतात की, दुसऱ्यांचा हक्क खाऊन पोट भरणे माणसाला काही काळ का होईना आनंद देऊ शकते. पण यामुळे कधीच समाधान मिळत नाही. म्हणूनच प्रेमानंद महाराजही म्हणतात की असे लोक अकाली मृत्यूला बळी पडतात.


इतरांची चेष्टा करणं


प्रेमानंद महाराज म्हणतात की, इतरांना त्रास देणारे कोणतेही काम मोठे नसते. स्वतःच्या मनोरंजनासाठी इतरांची खिल्ली उडवणे ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. म्हणूनच प्रेमानंद महाराज म्हणतात की इतरांना दुखावणारे काहीही करू नये, यामुळे अकाली मृत्यू होतो आणि ते पाप आहे.


कोण आहेत स्वामी प्रेमानंद महाराज ?


स्वामी प्रेमानंद जी महाराज हे वृंदावनातील प्रसिद्ध संत आहेत, त्यांचा जन्म कानपूर येथे झाला होता. ते भगवान शिवाचा भक्त असून काशीमध्ये राहतात आणि सत्संग करतात. त्यांचे आध्यात्मिक जीवन वयाच्या 13 व्या वर्षी सुरू झाले, त्यांचे गुरु श्री गौरांगी शरणजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्माकडे पाऊल टाकले. स्वामीजींचा सत्संग आणि शिकवण त्यांचे अनुयायी सोशल मीडियावर मोठ्या भक्तिभावाने आणि आवडीने ऐकतात.


हेही वाचा>>>


आई-वडिलांच्या कर्माचे फळ मुलांना खरंच भोगावे लागते? काय म्हटलंय शास्त्रात? प्रेमानंद महाराजांनी दिलं आश्चर्यकारक उत्तर!


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )