Hindu Religion: मासिक पाळी म्हणजे महिलांसाठी निसर्गाचे एक वरदान समजले जाते. मात्र भारतीय समाजात महिलांना दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. मासिक पाळीच्या काळात अनेकदा महिलांना अनेक धार्मिक कार्य करण्यास मनाई केली जाते. घरातील वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ माणसं याबाबत अनेकदा महिलांना विविध सल्ले देत असतात. असाच एका सल्ला महिलांना या काळात हमखास दिला जातो, तो म्हणजे मासिक पाळी सुरू असताना महिलांना केस धुण्यास नकार दिला जातो. काय आहे यामागचं कारण? आणि शास्त्रात त्याबद्दल काय म्हटलंय? जाणून घ्या..
भारतीय समाजात मासिक पाळीबाबत एकच नाही, तर अनेक प्रकारच्या चर्चा...
हिंदू धर्मात ज्याप्रमाणे पिंपळ आणि तुळशीला पवित्र मानले जाते, त्यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे घरातील आजी-आजोबा यांच्या भूमिकाही याच झाडाप्रमाणे आहेत. ज्याप्रमाणे पिंपळाचे मोठे झाड फळे देत नाही, पण सावली नक्कीच देते तसेच तुळशीचे छोटे झाड फुले-फळे देत नाही. पण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. आपल्या आयुष्यात आजी- आजोबांचीही अशीच भूमिका असते. त्यांचा सल्ला आणि प्रतिबंध आपल्याला भविष्यातील आणि वर्तमान समस्यांपासून वाचवतात. मासिक पाळीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय समाजात मासिक पाळीबाबत एकच नाही तर अनेक प्रकारच्या चर्चा आहेत. आजच्या आधुनिक युगात काही गोष्टी तुम्हाला मिथक वाटतील, पण त्या काळात निषिद्ध असलेल्या गोष्टी शास्त्र आणि विज्ञानाशी संबंधित आहेत.
मासिक पाळीच्या काळात महिलांना अनेक गोष्टी करण्यास मनाई?
मासिक पाळीच्या काळात महिलांना लोणच्याला हात लावणे, पूजा करणे, देवी-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करणे, झाडांना पाणी घालणे अशा अनेक गोष्टी करण्यास मनाई आहे. या निषिद्ध कामांपैकी एक म्हणजे केस धुणे. केस धुणे किंवा आंघोळ करणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. पण बहुतेक घरात मासिक पाळीच्या पहिल्या तीन दिवसात महिलांना केस धुण्यास मनाई केली जातो. काय कारण आहे यामागचे?
शास्त्र काय म्हणते?
ज्योतिषी अनिश व्यास सांगतात की, मासिक पाळीच्या काळात महिलांना धार्मिक कार्य करण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत, शरीर पूर्णपणे शुद्ध होईपर्यंत मंदिरात प्रवेश करू नये किंवा पूजा करू नये. त्यामुळे मासिक पाळी संपल्यावर महिलांनी केस धुवून आंघोळ करावी. त्याचबरोबर मासिक पाळीच्या समाप्तीनंतर केस न धुणाऱ्या महिलांचे शरीर शुद्ध मानले जात नाही. मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांत केस न धुण्याचाही सल्ला दिला जातो, कारण या काळात महिलांच्या शरीराचे तापमान गरम राहते आणि अशा परिस्थितीत केस धुतल्यावर शरीराचे तापमान वेगाने थंड होते. शरीराच्या तापमानात जलद बदल टाळण्यासाठी, यावेळी केस धुण्यास मनाई आहे.
हेही वाचा>>>
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )