Garud Puran: हिंदू धर्मातील लोकांसाठी गरुड पुराणाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जीवन आणि मृत्यूच्या समतोलाचे स्पष्टीकरण गरुड पुराणातही आढळते. भगवान विष्णू हे या पुराणाचे प्रमुख देवता मानले जातात. हिंदू धर्मात अंत्यसंस्काराबाबतही अनेक समजुती आहेत. यातील एक समज म्हणजे महिलांनी स्मशानभूमीत जाऊ नये. तुम्हाला माहीत आहे का? महिलांना स्मशानभूमीत जाण्यास बंदी आहे आणि त्यामागचे कारण काय आहे? ( Why do not women go to cremation in Hinduism?)


प्रत्येक धर्माची स्वतःची वेगळी संस्कृती आणि श्रद्धा


हिंदू धर्मात अंत्यसंस्काराशी संबंधित अनेक समजुती आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. अंत्यसंस्कार करणाऱ्यांमध्ये अशी समजूत आहे की, जेव्हा कोणाचा मृत्यू झाला, तेव्हा कुटुंबातील महिलांनी अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाऊ नये. गरूड पुराणात स्त्रियांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे आणि स्त्रियांनी स्मशानभूमीत का जाऊ नये हे देखील सांगितले आहे. प्रत्येक धर्माची स्वतःची वेगळी संस्कृती आणि श्रद्धा आहेत. तसेच हिंदू धर्मातही महिलांनी स्मशानभूमीत न जाण्याबाबत अशा काही समजुती प्रचलित आहेत.


महिला स्मशानभूमीत का जात नाहीत?


गरुड पुराणात वर्णन केलेल्या कथांनुसार, पुरुषांपेक्षा स्त्रियांचे हृदय कमजोर मानले जाते आणि असे मानले जाते की, जर कुटुंबातील व्यक्ती मृतदेह जाळताना रडला, आक्रोश केला तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही. जळत असलेला मृतदेह पाहून महिलांना रडू थांबवणं अशक्य वाटते, त्यामुळे महिलांना स्मशानभूमीत नेणे निषिद्ध मानले जाते. स्मशानभूमीत इतर काही गोष्टी आहेत ज्या स्त्रियांना आणि मुलांना पाहणे योग्य नाही, जसे की मृतदेह जाळण्यापूर्वी, त्याच्या कवटीला काठीने मारले जाते जे परंपरेनुसार येते. परंतु महिला आणि मुलांसाठी हे दृश्य पाहून मानसिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. बऱ्याच वेळा मृतदेह जळताना ताठ होतो आणि आवाज येतो, ज्यामुळे महिला आणि मुले घाबरतात, त्यामुळे त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवले जाते.


म्हणून पुरुषांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी देण्यात आलीय, गरुड पुराण काय म्हणते?


गरुड पुराणात सांगितलेली एक मान्यता अशी आहे की, मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर धार्मिक दृष्ट्या घराची पवित्रता आणि शुद्धीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कोणीतरी घरी राहून पूर्ण विधीपूर्वक हे काम करणे बंधनकारक आहे. ही जबाबदारी महिला चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात. हे लक्षात घेऊन स्मशानभूमीत जाऊन मृतदेह जाळण्याची जबाबदारी पुरूषांवर सोपवण्यात आली आहे आणि जबाबदारीची दुसरी बाजू पूर्ण करण्याची जबाबदारी महिलांवर सोपवण्यात आली आहे, ती म्हणजे पुरुषांना आंघोळ घालण्याचे आणि शुद्धीकरणाचे काम देण्यात आले आहे. यामागील आणखी एक कारण म्हणजे जेव्हा एखादा मृतदेह जाळला जातो, तेव्हा वातावरणात जंतू पसरतात जे शरीराच्या विविध भागांना चिकटून आजार होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या शरीरावर अडकलेले जंतू आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर सोडण्यासाठी असे केले जाते.


दुष्ट आत्म्याचे वास्तव्य, महिलांकडे होतात आकर्षित?


हिंदू धर्मावर आधारित इतर काही कारणांनुसार, असे म्हटले जाते की स्मशानभूमीत दुष्ट आत्म्याचे वास्तव्य असते जे पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे आणि विशेषतः कुमारी मुलींकडे जास्त आकर्षित होतात. कुमारीका, स्त्रियांवर वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि त्यांच्या नियंत्रणाखाली त्यांच्या शरीरात प्रवेश करतात अशी एक लोकप्रिय धारणा आहे. वाईट शक्तींच्या भयंकर प्रभावापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार, असेही म्हटले जाते की कुटुंबातील कोणत्याही सदस्याने स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यास त्याचे मुंडन करणे अनिवार्य आहे. ही परंपरा लक्षात घेऊन महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे


हेही वाचा>>>


Garud Puran: महिलांना मासिक पाळी म्हणजे पापांचे भोग? गरुड पुराणात याबद्दल काय म्हटलंय? जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )