Hartalika Teej 2024 : हरतालिका व्रत 06 सप्टेंबर रोजी साजरे केले जाणार आहे. देशातील अनेक भागांत हरतालिका (Hartalika) साजरी करण्यात येते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला (Women) निर्जल उपवास करतात. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. या दिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठीण उपवासांपैकी एक मानला जातो. 


विशेषत: ज्या महिलांचं नुकतंच लग्न झालं आहे. ज्या नवविवाहीत महिला आहेत अशा महिलांसाठी हे व्रत फार महत्त्वाचं आहे. त्यानुसार, या व्रताचे नियम नेमके कोणते ते जाणून घेऊयात. 


हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त


पंचांगानुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. 6 सप्टेंबर रोजी उदय तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असेल.


हिंदू पंचांगानुसार, 06 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या हरतालिकेची व्रत असणार आहे. देशातील अनेक भागांत हरतालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.


हरतालिका व्रताचे नियम 



  • हरतालिकेचे व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला करावे.

  • हे व्रत सुवासिनींनी तसेच कुमारिकांनी करावे. 

  • शास्त्रानुसार, हरतालिकेचे व्रत एकदा करायला सुरुवात केल्यानंतर ते आजन्म पाळावे. ते मध्येच सोडून देऊ नये. 

  • दरवर्षी शास्त्रात दिलेल्या विधीनुसार हरतालिकेची पूजा करावी. तसेच, पूजेच्या दरम्यान कथा वाचावी. 

  • शास्त्रानुसार, हरतालिकेचे व्रत निर्जळी करावे. व्रताच्या दरम्यान चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करु नये.

  • या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे नामस्मरण करावे. 

  • हरतालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे तसेच पूजा मांडावी. त्यानंतर कथा वाचून आरती करावी. 

  • हरतालिकेचे व्रत करत असाल तर दिवसभर रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. या दरम्यान घरातील व्यक्तींबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. 

  • हरतालिका व्रताचा उपवास करत असाल तर तो दुसऱ्या दिवशी सोडावा. 

  • दुसऱ्या दिवशी हरितालिकेची मांडलेली पूजा, फुले, वाळू इ. गोष्टींचे विसर्जन स्वच्छ पाण्यात करावे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Hartalika Teej 2024 : उद्या हरितालिकेचा दिवस...जाणून घ्या पूजेची योग्य वेळ, शुभ मुहूर्त, तिथी आणि साहित्याची A to Z यादी