एक्स्प्लोर

Hartalika 2026 : हरतालिकेच्या दिवशी जुळून आले 3 शुभ संयोग; महिलांनी 'या' 5 चुका अजिबात करु नका, अन्यथा...

Hartalika 2026 : यंदा हरतालिकेच्या दिवशी गणेश चतुर्थी आणि निर्जला एकादशी सोमवारच्या दिवशीच आहे. हा दिवस भगवान शंकराला प्रिय आहे.

Hartalika 2026 : दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचं (Hartalika 2026) व्रत करतात. त्यानुसार, यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी हरतालिका असणार आहे. या दिवशी महिला अखंड सौभाग्यासाठी तसेच, पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतात भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. 

विशेष म्हणजे, यंदा हरतालिकेच्या दिवशी गणेश चतुर्थी आणि निर्जला एकादशी सोमवारच्या दिवशीच आहे. हा दिवस भगवान शंकराला प्रिय आहे. हा दुर्लभ संयोग जवळपास तीन वर्षांनी जुळून आला आहे. त्यामुळे हरतालिका व्रताच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊयात. 

हरतालिका व्रत 2026 तिथी 

हरतालिकेचं व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला केलं जातं. यावर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला म्हणजेच, 13 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजून मिनिटांनी हे व्रत सुरु होणार आहे. तर, याची समाप्ती 14 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी होणार आहे. मात्र, उद्य तिथीनुसार, हरतालिकेचं व्रत 14 सप्टेंबर सोमवारच्या दिवशी असणार आहे. 

हरतालिका व्रताच्या दिवशी 'या' चुका टाळा...

काळ्या रंगाचा वापर टाळा 

हरतालिका व्रताच्या दिवशी सुवासिनी महिलांनी काळ्या रंगाच्या वस्तूचा वापर करु नये. तसेच, काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करु नये. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे, काळ्या बांगड्या किंवा कोणत्याही प्रकारच्या काळ्या वस्तूचा वापर करु नये. या दिवशी हिरवा, लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभकारक मानलं जातं. 

सात्विक आहार 

हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी घरात सात्विक आहार घ्यावा. या दिवशी मांसाहार तसेच, कांदा-लसुणचं सेवन करु नये. घरातच सात्विक आहार बनवावा. तसेच, भगवान शंकराला खीर नैवेद्याला द्यावी आणि तीच खीर प्रसाद म्हणून वाटावी. 

पतीशी भांडण करु नका

हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी तुमचं मन शांत असणं फार गरजेचं आहे. या दिवशी पतीबरोबर कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. तसेच, अहंकार, राग यांसारखे भाव मनात निर्माण करु नका. ध्यान, पूजा आणि भक्तीत मन रमवा. तसेच, घरात आलेल्या पाहुण्यांना वाईट वागणूक देऊ नका. 

केस-नखं कापणे किंवा दिवसा झोपणे 

हरतालिकेचं व्रत हे सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी केस, नखं कापणे यांसारखी कार्य करु नये. तसेच, ज्या महिलांनी व्रत ठेवलं आहे त्यांनी या दिवशी दिवसा झोपू नये. तर, भगवान शंकर आणि देवी पार्वतीचं ध्यान करा. 

गणपतीच्या पूजनापासून सुरुवात करा

हरतालिकेच्या पूजनात गणपतीचं विशेष स्थान आहे. पूजा सुरु करण्याच्या आधी गणरायाचं स्मरण करण्याची आणि पूजा करण्याची परंपरा आहे. त्यानंतर, भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा करा. मान्यतेनुसार, असं केल्यास पूजा विधी संपन्न मानली जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी सप्टेंबरचा तिसरा आठवडा ठरणार गेमचेंजर; गणरायाच्या आगमनाने 4 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
2027 मध्ये 'या' राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट, तर 'या' राशींची होणार साडेसातीपासून सुटका; तुमची रास कोणती?
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशीचे प्रगतीचे दिवस, डिसेंबरचा पहिला आठवडा लय भारी! फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
कुंभ, मीन राशीचे प्रगतीचे दिवस, डिसेंबरचा पहिला आठवडा लय भारी! फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Shani Sade Sati : 2027 ते 2030 पर्यंत 'या' 2 राशींवर असणार शनिची ढैय्या; एकामागोमाग येतील संकटं, तुमची रास कोणती?
2027 ते 2030 पर्यंत 'या' 2 राशींवर असणार शनिची ढैय्या; एकामागोमाग येतील संकटं, तुमची रास कोणती?
Advertisement

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget