Guru Shukra Yuti 2024 : देवगुरु बृहस्पतीला ज्योतिष शास्त्रात फार शुभ आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. गुरु ग्रह हा ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीचा कारक आहे. कालच (1 मे रोजी) गुरु ग्रहाने मेष राशीतून वृषभ राशीत संक्रमण केले. तर, येत्या 19 मे रोजी शुक्र (Shukra) वृषभ राशीत संक्रमण करणार आहेत. शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीत (Taurus Horoscope) संक्रमणाने या राशीत शुक्र आणि गुरुची युती (Guru Shukra Yuti) होणार आहे. तर, गुरु-शुक्रच्या युतीने काही राशींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


गुरु-शुक्रची युती वृषभ राशीत होणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना याचा चांगला लाभ मिळणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना व्यवसाय, करिअर, शिक्षण आणि संपत्तीच्या बाबतीत यश मिळेल. तसेच, प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


गुरु-शुक्रच्या युतीमुळे मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होतील. तुम्हा परदेशी प्रवासाला जाण्याची देखील संधी मिळू शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. तसेच, गुरु-शुक्रच्या युतीने तुमचा मान-सन्मान वाढेल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


या युतीमुळे कर्क राशीच्या लोकांना देखील चांगलाच फायदा होणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. काही लोकांना वडिलोत्पार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. गुरुमुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. त्यामुळे तुम्ही खूप प्रसन्न असाल. 


सिंह रास (Leo Horoscope) 


गुरु-शुक्राच्या युतीमुळे तुम्ही तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्षम असाल. तसेच, पैसे कमावण्याचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. ही युती तुमच्यासाठी फारच अनुकूल ठरणार आहे. शुक्र ग्रहाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख-शांती येईल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


नक्षत्रात गुरु-शुक्राच्या युतीमुळे कन्या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यावसायात खूप प्रगती करण्याची संधी आहे.व्यावसायाशी संबंधित तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. तसेच, तुमची आर्थिक चणचण दूर होऊन चांगली परिस्थिती येईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Dev : 2024 मध्ये 'या' राशींवर आहे शनीची कृपा, तर 2025 पर्यंत 'या' राशींवर असणार करडी नजर, प्रत्येक कामात राहावं लागेल सावधान