Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीचं (Lord Shani) महत्त्व अनन्यसाधारण आहे. शनीने (Shani Dev) एका राशीत प्रवेश केल्यानंतर तब्बल अडीच वर्ष तो त्याच राशीत असतो. त्यानंतर शनी राशीपरिवर्तन करतात. त्यामुळे शनीच्या राशीपरिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होतो आणि तो दिर्घकाळ टिकणारा असतो. सध्या शनी आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत आहे. त्यामुळे सध्या कोणकोणत्या राशींवर शनीची कृपा आहे आणि पुढच्या वर्षी कोणत्या राशींवर शनीची साडेसाती असणार ते जाणून घेऊयात. 


शनीच्या आशीर्वादाने सगळी कामं पूर्ण होतात


असं म्हणतात की, शनीची ज्या राशींवर कृपा असते त्या राशींची सगळी कामं पूर्ण होतात. तर, ज्या राशींवर शनी क्रोधित होतात त्यांना मात्र अनेक संकटांचा सामना करावा लागतो. 


'या' राशींवर असेल शनीची कृपा 


वृषभ रास 


शनीदेवाच्या उदयाने वृषभ राशीच्या लोकांवर चांगला परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांनी ठरवलेली प्रत्येक कामं पूर्ण होतील. तसेच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये देखील चांगले परिणाम पाहायला मिळतील. अचानक धन-लाभ होण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रीण आणि कुटुंबियांची साथ मिळेल. तसेच, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित तुम्ही ठरवलेली सगळी कार्य वेळेत पार पडतील. 


धनु रास 


शनीच्या उदयामुळे धनु राशीचं नशीब पालटणार आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेली तुमची आर्थिक चणचण शनीच्या प्रभावामुळे कमी होईल. आणि तुमच्या करिअरमध्ये देखील मुलांकडून तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल. या दरम्यान तुम्ही दूरच्या प्रवासाला देखील जाण्याचा चांगला योग जुळून आला आहे. मात्र, स्वत:ची काळजी घ्या. या दरम्यान तु्म्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. तसेच, तुमच्या आत्मसन्मानात वाढ होईल.  


तूळ रास 


तूळ राशीवर देखील शनीची कृपा असणार आहे. या दरम्यान तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल. तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनेक मोठ्या संधी मिळतील. तसेच, तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होईल. 


2025 पर्यंत 'या' राशींवर असणार शनीची साडेसाती 


सध्या शनी आपल्या मूळ राशीत आहे. तर, 29 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. शनीच्या बदलत्या चालीमुळे अनेक राशाींवर याचा परिणाम होतो.  खरंतर, कोणत्याही ग्रहाची वक्री चाल अशुभ मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची ज्या राशींवर उलटी चाल असणार आहे त्या राशींनी 2025 पर्यंत सावधान असण्याची गरज आहे. ज्या राशींवर शनीची साडेसाती आणि ढैय्या सुरु आहे त्याच राशींवर शनीच्या वक्री चालचा प्रभाव पडणार आहे. 


मिथुन रास 


शनीच्या वक्री चालीचा मिथुन राशीवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना अने समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचे वाद होतील. पैशांच चणचण भासू शकते. या राशीच्या लोकांनी पुढच्या 11 महिन्यापर्यंत कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करू नये असा सल्ला देण्यात आला आहे. 


कर्क रास 


शनीच्या वक्री चालीचा परिणाम कर्क राशीवर देखील होणार आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचे मतभेद होतील. अनेक गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत. तसेच, आरोग्याच्या जुन्या समस्या पुन्हा उद्भवतील त्यामुळे तुमची सतत चिडचिड होईल. या दरम्यान व्यापाऱ्यांनी सर्वात जास्त सावधान राहण्याची गरज आहे. 


वृश्चिक रास 


शनीच्या उलट्या चालीने वृश्चिक राशीचा तणाव वाढणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीवर याचा नकारात्मक परिणाम होईल.या काळात पैशांची देवाणघेवाण करू नका. तुम्ही मेहनत कराल पण तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Surya Gochar 2024 Effects : 13 दिवसांनंतर सूर्याचं होणार संक्रमण! 'या' 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ; पदोपदी मिळतील शुभ संकेत