Guru Purnima 2024 : हिंदू धर्मात आषाढी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2024) किंवा व्यासपौर्णिमा असं म्हणतात. महाभारत, पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस आहे. या वर्षी गुरुपौर्णिमा 21 जुलैला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गुरुंचे पूजन केले जाते. वेद व्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी व्यास जयंतीही साजरी केली जाते.
आपल्या जीवनात गुरुचं स्थान हे सर्वात महत्त्वाचं समजलं जातं. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गुरुचे आभार मानण्यासाठी म्हणून भारतात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. महाभारत या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यास ऋषींच्या कार्याच्या स्मरणात भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुंना हे खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश (Guru Purnima Wishes In Marathi)
गुरुशिवाय ज्ञान नाही,
ज्ञानशिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देन,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन
माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनाच्या प्रत्येक समस्येत
तुमची असावी साथ
डोक्यावर तुमचा हात असावा
हीच इच्छा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
खऱ्या खोट्याची ओळख पटवून
देणाऱ्या महान गुरुंना
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...
आपल्या गुरुची मूर्ती आपल्या मनात
कायम असली की आपला मार्ग कधीच चुकत नसतो
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..
गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
लाख रुपये कमावूनसुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा :