Jupiter : वृषभ राशीत गुरु होणार अस्त; 'या' राशींना घ्यावी लागणार अधिक काळजी
Jupiter Combust In Taurus: अवघ्या काही महिन्यांत बृहस्पतिचा वृषभ राशीत अस्त होईल, याचा काही राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. तर काही राशींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडणार आहे.
Guru Asta 2024 : धन आणि सुखाचा कारक असलेला देव गुरू बृहस्पति विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलत राहतो. बृहस्पतिच्या राशी बदलामुळे 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी परिणाम होतच असतो. गुरुला पुन्हा एका राशीत परत येण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागतात. यावेळी गुरु 12 वर्षांनी वृषभ राशीत प्रवेश करत आहे. अशा स्थितीत, गुरू ग्रह अस्त आणि वक्री अवस्थेत देखील जातो. गुरुच्या (Jupiter) या चालींचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो.
गुरू 1 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, यानंतर 3 मे 2024 रोजी पहाटे 3:21 वाजता गुरू वृषभ राशीत अस्त होईल. बृहस्पतिच्या अस्ताचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल, तर काही राशींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडेल. गुरुच्या अस्तामुळे कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागणार आहे? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
गुरुच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांनी 3 मे नंतरच्या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. थोडासाही निष्काळजीपणा तुमच्या आयुष्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. तुमच्या गुरू आणि वडिलांकडून फारसे सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडे निराश होऊ शकता. या काळात तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल.
कर्क रास (Cancer)
गुरु ग्रहाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना थोडं सावध राहावं लागणार आहे. तुमच्या अगदी छोट्या छोट्या कामातही अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणीही थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मे ते जून या काळात वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात. काही मुद्द्यावरून कुटुंबात मतभेद होऊ शकतात. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
मेष रास (Aries)
गुरूच्या अस्ताचा मेष राशीच्या लोकांवर संमिश्र परिणाम होणार आहे. 3 मे पासून या राशीच्या लोकांना छोट्या कामांसाठीही जास्त मेहनत करावी लागू शकते. तुम्ही बोलताना विशेष काळजी घ्या, कारण विचार न करता बोलल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. गुरुच्या अस्ताच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: