Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षाची सुरू ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा..! दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढी पाडवा साजरा केला जातो. देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते. गुढीपाडवा नेमका कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, शुभ योगामध्ये संभ्रम असेल तर ही बातमी वाचाच...
गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीलाही सुरूवात!
गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात. तसेच, ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. ज्योतिषांच्या मते, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्याच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते.
ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली?
काही धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली, असा सनातन शास्त्रात उल्लेख आहे. या शुभ मुहूर्तावर विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव यांची पूजा केली जाते.
शुभ मुहूर्त
ज्योतिषांच्या मते, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 वाजता सुरू होईल आणि 30 मार्च रोजी दुपारी 12:49 वाजता समाप्त होईल. सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते. त्यामुळे गुढीपाडवा 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.
ब्रह्म मुहूर्त - 04:41 पहाटे ते 05:27 पहाटे
विजय मुहूर्त - दुपारी 02:30 ते 03:19 पर्यंत
संध्याकाळची वेळ - संध्याकाळी 06:37 ते 07
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:01 ते 12:50 पर्यंत
निशिता मुहूर्त- सकाळी 12:02 ते दुपारी 12:48 पर्यंत
शुभ योगात साजरा होणार गुढीपाडवा!
गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग तयार होतोय. या योगाचा योग संध्याकाळी 5:54 पर्यंत आहे. या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते. तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग होत आहे. 31 मार्च रोजी दुपारी 04:35 ते 06:12 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी 06:13 ते दुपारी 04:35 पर्यंत असते. याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी बव, बलव आणि कौलव करण होण्याची शक्यता आहे.
पंचांग
सूर्योदय - सकाळी 06:13
सूर्यास्त - संध्याकाळी 06:38
चंद्रोदय- सकाळी 06:34
चंद्रास्त - संध्याकाळी 07:50
हेही वाचा>>>
Navpancham Rajyog: टेन्शन सोडा! शनि-मंगळाचा शक्तिशाली राजयोग बनतोय, 'या' 3 राशीचे लोक राजासारखं जीवन जगणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )