Oscars 2025: अमेरिकेतील (America) लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) जगातील सर्वात प्रतिष्ठेचा असा 97वा अकॅडमी अवॉर्ड (97th Academy Awards) सोहळा पार पडला. यंदाचा सोहळा होस्ट करण्याचं भाग्य कॉनन ओ'ब्रायन (Conan O'Brien) यांच्या पदरात पडलं होतं. अशातच, यंदा कॉनन ओ'ब्रायन यांनी होस्टिंग करताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्कर 2025 सोहळ्याला सुरुवात करताना कॉनन ओ'ब्रायन यांनी अचानक हिंदीत बोलायला सुरुवात केली आणि भारतासह संपूर्ण जगाच्या भुवया उंचावल्या. कॉनन ओ'ब्रायन यांच्या कृत्यानं अनेकांना सुखद धक्का दिला. तर, हिंदीत बोलल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, 97 व्या अकादमी पुरस्कारांचे भारतात 'जियो हॉटस्टार' आणि टीव्ही चॅनल 'स्टार प्लस'वर थेट प्रक्षेपण करण्यात आलेलं.
पहिल्यांदाच ऑस्करचे सूत्रसंचालन करणारे कॉनन ओ'ब्रायन यांनी समारंभाच्या सुरुवातीला भारतीय प्रेक्षकांना संबोधित केलं आणि थेट हिंदीत बोलायला सुरुवात केली. ओ'ब्रायन म्हणाले की, "आप में से जो लोग भारत से देख रहे हैं, मैं उनसे कहना चाहता हूं कि भारत के लोगों को नमस्कार। वहां सुबह हो चुकी है तो मुझे उम्मीद है कि नाश्ते के साथ वे ऑस्कर समारोह देख रहे हैं।"
Conan O'Brien यांचा व्हायरल VIDEO
भारतीयांना सुखद धक्का...
सोशल मीडिया मंच 'एक्स' वर अनेक लोकांनी ओ'ब्रायन यांनी हिंदी बोलण्याचा जो प्रयत्न केला, त्याचं कौतुक केलं आहे. एका युजरनं म्हटलं आहे की, "कॉनन ओ'ब्रायन परदेशी भाषेत बोलण्याचा उत्तम प्रयत्न केल्यामुळे ऑस्करसाठी पात्र आहेत...", आणखी एका युजरनं म्हटलं आहे की, "कॉनन ओ'ब्रायननं भारताप्रती कृतज्ञता व्यक्त करून ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात केली... भारतातील प्रेक्षकांशी जोडण्यासाठी त्यांनी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला...".
अनेकांकडून टीकेची झोड
अनेकजण अजिबात खूश नाहीत. सोशल मीडियावर एकानं टीका करताना म्हटलं आहे की, "उत्तम प्रयत्न आहे, पण खरं सांगायचं तर ओ'ब्रायननं हिंदी अभिवादन पूर्णपणे संपवलं आहे." तर आणखी एका युजरनं म्हटलं आहे की, "...ही हिंदी अजिबात नव्हती"
महत्त्वाच्या इतर बातम्या :