Grahan 2023 Date : 2022 च्या चंद्रग्रहणानंतर (Chandra Grahan 2022) , पुढील चंद्रग्रहण थेट मे आणि ऑक्टोबर 2023 मध्ये होईल, जे भारताच्या अनेक भागांमध्ये दिसेल. हे चंद्रग्रहण अंशतः दिसणार आहे. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र तिन्ही एका रेषेत असतात तेव्हा चंद्रग्रहणाची स्थिती उद्भवते. वर्ष 2022 मध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण झाले. आता पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये कधी आणि किती ग्रहण होणार आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती 


2023 मध्ये चंद्रग्रहण कधी होईल?
2023 मध्ये पहिले चंद्रग्रहण 5 मे आणि दुसरे चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल, जे यापूर्वी 19 नोव्हेंबर 2021 रोजी झाले होते. भारतात 7 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे.



चंद्रग्रहणासाठी आगामी तारखा आणि वर्षे -
2023 - 5 मे आणि 29 ऑक्टोबर
2024- मार्च 25 आणि सप्टेंबर 18
2025- 14 मे आणि 7 सप्टेंबर
2026 - 3 मार्च आणि 28 ऑगस्ट
2027- 21 फेब्रुवारी


2023 : सूर्यग्रहणाची तारीख आणि वेळ


2023 वर्षातील पहिले सूर्यग्रहण: हिंदू कॅलेंडरनुसार, 2023 सालचे पहिले सूर्यग्रहण गुरुवारी, 20 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध ठरणार नाही. हे सूर्यग्रहण मेष राशीत होईल. या सूर्यग्रहणाचा प्रभाव मेष, कर्क, तूळ आणि मकर राशीवर राहील. पंचांगानुसार, 2023 चे पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होईल.


2023  वर्षातील दुसरे सूर्यग्रहण: 2023 सालचे दुसरे सूर्यग्रहण शनिवारी, 14 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. म्हणजेच 2023 मध्ये दोन्ही सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीत. दुसरे सूर्यग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिका आणि आर्क्टिकामध्ये दिसणार आहे.


चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' चुका करू नका.
1. चंद्रग्रहणाच्या वेळी झोपू नये. ज्योतिष शास्त्रानुसार अशा वेळी झोपल्याने व्यक्तीमध्ये आळस आणि रोग वाढतात.
2. ग्रहणकाळात कोणतीही तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू वापरणे टाळा.
3. चंद्रग्रहण काळात पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका. परंतु, तुम्ही तुमच्या इष्टदेवाचे मनाने ध्यान करू शकता.
4. चंद्रग्रहणानंतर पाण्यात दोन-चार थेंब गंगेचे पाणी किंवा तुळशीपत्र मिसळून स्नान करावे. यानंतर, आपल्या क्षमतेनुसार दान करा.


सुतक 9 तास आधी 
चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक कालावधी मानला जातो. म्हणून ग्रहणाच्या 9 तास आधी स्नान वगैरे करून पुजेसारखे शुभ कार्य करावे. यावेळी मंदिराचे दरवाजेही बंद असतात.


इतर महत्वाची माहिती


Astrology : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप! चक्रीवादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी काय संबंध?