Gemini Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा फार खास असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा मिथुन राशीसाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)
नवीन आठवड्यात जोडीदाराचे लाड करा, त्या बदल्यात तुम्हालाडी प्रेम मिळू शकतं. कोणताही निर्णय घेताना जोडीदाराच्या भावनांचा विचार करा. प्रेम जीवनात संवादाला खूप महत्त्व आहे. तुम्हाला तुमच्या
जोडीदारासोबत बसून बोलण्याची गरज आहे. जोडीदारासाठी वेळ काढा. लग्नाचा निर्णय घेण्यासाठी आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले असतील. अविवाहित मिथुन राशीचे लोक देखील या आठवड्यात खास व्यक्तीला भेटू शकतात. विवाहित महिलांनी ऑफिस रोमान्सपासून दूर राहावं.
मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)
बोलताना काळजी घ्या, जास्त बोलू नका, वरिष्ठांना ते आवडणार नाही. या आठवड्यात ज्यांची मुलाखत आहे ते कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वी होऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक्स, कापड, वाहतूक, या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात चांगला नफा मिळू शकतो. परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक बातमी मिळू शकते.
मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)
पैशाशी संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणं चांगलं राहील. कोणतीही कायदेशीर समस्या सहज सोडवता येईल. या आठवड्यात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. काडी लोक त्यांच्या घरांचं नूतनीकरण करतील. व्यवसायासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचाही विचार करू शकता. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसाय करणारे लोक थकीत रकमेची परतफेड करण्यात यशस्वी होऊ शकतात.
मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्ही निरोगी राहाल आणि सुट्टीची योजना करू शकता. आपलं औषध घेण्यास विसरू नका. जंक फूड आणि अल्कोहोलपासून दूर राहा. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. काही महिलांना व्हायरल ताप, घसा खवखवणं किंवा मायग्रेन सारख्या समस्या असू शकतात. जे लोक वाहन चालवतात त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :