Gemini Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपून तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा नेमका कसा असणार आहे याची प्रत्येकाला उत्सुकता असते. राशीभविष्यातही ग्रहांच्या चालीनुसार प्रत्येक राशीचं साप्ताहिक भविष्य (Weekly Horoscope) कसं असणार आहे याचा साधारण अंदाज लावला जातो. त्यानुसार मिथुन राशीचा (Taurus Horoscope) येणारा आठवडा नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 


मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope) 


या आठवड्यात लव्ह लाईफमध्ये मतभेद होऊ शकतात, वाद झाल्यास योग्य निर्णय घ्या. तुमच्या आधीच्या प्रियकराशी तडजोड करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. विवाहित लोकांनी विवाहबाद्य संबंध टाळावे, कारण त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. जे लग्न करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. लवकरच शुभवार्ता मिळेल. 


मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)


या आठवड्यात तु्म्हाला व्यावसायातील तुमचा दरारा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. या आठवड्यात आयटी, हेल्थकेअर, लॉ, हॉस्पिटॅलिटी, इंजिनीअरिंग आणि डिझायनर्सचं शेड्युल पॅक असेल, तुमच्यावर कामाचा जास्त लोड असेल. नोकरदारांनी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं आणि प्रगतीच्या नवीन संधी शोधाव्या. या आठवड्यात कामादरम्यान रागावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा.


मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)


नवीन आठवड्यात तुम्ही आर्थिक बाबतीत भाग्यवान राहाल. पैशासंबंधी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. धर्मादाय कार्यात तुम्ही पैसा खर्च करू शकता. मित्र किंवा नातेवाईकांसोबत चालू असलेले आर्थिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही घर किंवा जमिनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात शेअर बाजार आणि नवीन व्यवसायातील गुंतवणूक पर्यायांवर लक्ष ठेवा.


मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)


या आठवड्यात तुमच्या आरोग्यात किरकोळ चढ-उतार दिसेल. जे लोक मद्याचं सेवन करतात त्यांना या आठवड्यात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. शक्यतो अल्कोहोल पिणं टाळा. ऑफिसचा दबाव घरी आणू नका आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 15 to 21 April : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक