Gemini March Horoscope 2024 : मिथुन (Gemini) राशीच्या लोकांसाठी मार्च महिना (Monthly Horoscope) तसा ठिकठाक जाणार आहे. मात्र या महिन्यात तुम्हाला प्रत्येक काम एकाग्रतेने करावं लागणार आहे. या महिन्यात आर्थिक व्यवहार टाळल्यास बरं होईल.आरोग्याबाबत काळजी घेण्याचीही आवश्यकता नाही. व्यावसायिक जगाशी संबंधित लोकांना फायदा होईल, तर विद्यार्थ्यांसाठीही हा महिना चांगला असेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या मार्च महिना कसा असेल? सविस्तरपणे जाणून घेऊया.


मिथुन राशीचे करिअर (Gemini Job Career Horoscope March 2024)


नवीन महिन्यात राहूची पंचम दृष्टी तुमच्या राशीच्या सहाव्या भावात असेल, त्यामुळे मार्च महिन्यात तुम्हाला ऑफिसमध्ये काम करावसं वाटणार नाही, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बॉसकडून ओरडा देखील ऐकावा लागू शकतो.


14 ते 25 मार्चपर्यंत दशम भावात सूर्य-बुधाचा बुधादित्य योग असल्यामुळे तुम्ही तुमचं नेटवर्क विस्तारण्यात व्यस्त असाल,  ज्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक चांगल्या संधी मिळतील. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील आणि त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकाल.


14 मार्चपासून दशम भावात सूर्य-राहूचं ग्रहण दोष असेल, त्यामुळे या काळात सावध राहा. ज्या गोष्टींशी तुमचा काहीही संबंध नाही अशा गोष्टींमध्ये अडकून तुमचा वेळ आणि शक्ती वाया घालवू नका.


15 मार्चपासून मंगळ नवव्या भावात शनिसोबत अंगारक दोष निर्माण करेल, या काळात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.


विद्यार्थ्यांसाठी महिना कसा? (Student Monthly Horoscope March 2024)


विद्यार्थ्यांसाठी नवीन महिना चांगला राहील. मार्च महिन्यात तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्रियाकलापांमध्ये भाग घ्याल. तुम्ही गायनाचे आणि नृत्याचे क्लास लावू शकता. 7 मार्च ते 30 मार्च या काळात नवव्या भावात शुक्र-शनिची युती राहील, त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याच्या शेवटी विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर तुमचं काम कुठेतरी अडू शकतं. तुम्ही दिलेल्या परीक्षांचा निकाल चांगला लागेल आणि तुम्हाला अपेक्षित गुण मिळतील.


मिथुन राशीचं मार्चमधील आरोग्य आणि प्रवास जीवन (Gemini Health And Travel March 2024)


नवीन महिन्यात तुम्हाला बोलताना तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात आणि तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. 7 ते 25 मार्चदरम्यान दशम भावात बुध-राहूचा जडत्व दोष असेल, त्यामुळे या काळात तुम्हाला सावध राहावं लागेल, बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. 15 मार्चपासून तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. दैनंदिन दिनक्रम, योग आणि निरोगी जीवनशैली राखल्यास आरोग्य चांगलं राहील. आठव्या भावात केतूची पंचम दृष्टी असल्यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला त्रास होऊ शकतो


मिथुन राशीसाठी उपाय (Gemini Remedies March 2024)


8 मार्च, महाशिवरात्री :- “ओम नागेश्वराय नमः” या मंत्राचा जप करा. शिवलिंगाची पूजा करा.


24 मार्च, होळी :- होळीच्या दिवशी दहनात 100 ग्रॅम हरभरा डाळ टाका. दुसऱ्या दिवशी 3 चिमूट होलिका दहनाची राख घरी आणा, यामुळे मानसिक चिंता दूर होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Taurus March Horoscope 2024 : वृषभ राशीसाठी मार्च महिना ताणतणावाचा आणि अडचणींचा, जाणून घ्या मासिक राशीभविष्य