Taurus March Horoscope 2024 : हा महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी फार चांगला म्हणता येणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रातही अडथळे निर्माण होऊ शकतात. या महिन्यात आरोग्याचीही काळजी घ्या. वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना नोकरी, शिक्षण, प्रवास, आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत कसा राहील हे जाणून घेऊया.
वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)
6 मार्चपर्यंत दशम भावात सूर्य-बुध योग असेल. यामुळे या महिन्यात सकारात्मक विचार करून पुढे जा. 15 मार्चपासून दशम भावात मंगळ आणि शनीचा अंगारक दोष असल्यामुळे काही जुनी सरकारी कामे अडकून पडू शकतात ज्यामुळे तुमच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्या सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांची शिफारस घ्यावी लागेल मन शांत ठेवा आणि रागावरही नियंत्रण ठेवा. 13,14,19,20,21,27,28,29 मार्च रोजी तुम्हाला नवीन संधी मिळण्याच्या शक्यता आहे. 14 मार्चपासून वरिष्ठांशी काही मतभेद होऊ शकतात, ते वेळीच सोडवावे लागतील अन्यथा त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची एकाग्रता बिघडेल.
विद्यार्थ्यांसाठी महिना कसा? (Student Monthly Horoscope)
उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. गुरू-केतूचा षडाष्टक दोष असल्याने शैक्षणिक क्षेत्रात काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला संयमाने पुढे जावे लागेल. 15 मार्चपासून तुम्ही अधिकाधिक विषयांचा अभ्यास कराल. यासह, तुमचा सराव पूर्वीपेक्षा खूप चांगला होईल आणि तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील.
आरोग्य (Health)
वैद्यकीय चाचण्यांच्या खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. 15 मार्चपासून दशम भावात मंगळ आणि शनीचा अंगारक दोष असेल त्यामुळे तुमची गाडी कोणालाही चालवू देऊ नका कारण अपघात झाल्यास तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. 14 ते 25 मार्च या कालावधीत अकराव्या भावात सूर्य-बुध बुधादित्य योग असल्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याची योजना बनवाल. हा प्रवास तुमच्या नात्यात गोडवा आणेल आणि त्यांना मजबूत करेल.
वृषभ राशीसाठी उपाय
8 मार्च महाशिवरात्री - 'ओम सोमनाथाय नमः' या मंत्राचा 10 मिनिटे जप करा .
24 मार्च होळी - होळीच्या दुस-या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर 11 चिमूटभर होलिका दहन भस्म आणि चांदीचे नाणे एका पांढऱ्या कपड्यात बांधावे. हे तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: