Gemini Horoscope Today 9th March 2023 : कामात यश, कुटुंबाचं सहकार्य पण, संयमही गरजेचा; 'असा' आहे आजचा मिथुन राशीचा दिवस
Gemini Horoscope Today 09th March 2023 : कामाची गती वाढवा.तुम्ही हाती घेतलेल्या कामाला यश मिळणार आहे. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत सहभाग टाळा.
Gemini Horoscope Today 09th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. नोकरदार वर्गासाठी, आजचा दिवस चांगला असेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल. आज तुम्हाला जास्त उत्पन्न असलेल्या नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. तुमचे विचार आणि ऊर्जा अशा कामांमध्ये लावा जिथे तुमची स्वप्नं प्रत्यक्षात साकार होऊ शकतील.
आज व्यवसाय करणारे लोक आपल्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करतील. वरिष्ठ सदस्य देखील तुमच्या व्यवसायात तुम्हाला मदत करतील. तसेच, कामाची गती वाढवा.तुम्ही हाती घेतलेल्या कामाला यश मिळणार आहे. आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत सहभाग टाळा.
संयम राखा
आज तुमच्यात संयमाची कमतरता असेल. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कारण तुमचा कठोरपणा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास देऊ शकतो. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. तिसर्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्यात आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये तेढ निर्माण होईल. आज तुमचे कुटुंबीय तुमच्यासोबत अनेक समस्या शेअर करतील. त्या ऐकून घ्या. तसेच, रिकाम्या वेळात असे काहीतरी करा, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.
आज मिथुन राशीचे आरोग्य :
आज मिथुन राशीच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील. पण, कामामुळे मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या दरम्यान थोडा वेळ विश्रांती घ्या.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय :
तुम्हाला नोकरीशी संबंधित कोणत्या समस्या असतील तर केळीच्या झाडाची पूजा करा आणि फळे, कपडे यांसारख्या पिवळ्या वस्तूंचे दान करा. पण केळी खाणं टाळा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :