Gemini Horoscope Today 15 February 2023 : मिथुन आजचे राशीभविष्य, 15 फेब्रुवारी 2023 : मिथुन राशीच्या लोकांचे नशीब आज साथ देत आहे आणि पैशाच्या बाबतीत तुम्हाला आज विशेष लाभ मिळू शकतो. आरोग्य देखील सामान्य राहील, कुटुंबातील सदस्यांसोबत दिवस चांगला जाईल. आज प्रवास टाळणे योग्य राहील. आजचे राशीभविष्य जाणून घ्या



मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील?
आज मिथुन राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील, आजचा दिवस तुमच्या मेहनतीला यश मिळवून देणारा आहे. ज्या प्रकल्पावर तुम्ही बराच काळ काम करत होता, त्याचे निकाल आज येऊ शकतात. आज परिस्थिती तुमच्या अपेक्षेनुसार अनुकूल असेल, परंतु आज एखाद्या खास व्यक्तीकडून तुमची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा गोंधळ होऊ शकतो. विचार न करता कोणतेही काम करू नका, एक छोटीशी चूक तोट्यात बदलू शकते. ऑनलाइन माध्यमातून शिक्षणाशी संबंधित काम वाढेल. नोकरदार वर्गातील काही कर्मचारी जे घरून काम करत होते, त्यांचे उत्पादन आणखी वाढेल.



आज मिथुन राशीचे कौटुंबिक जीवन
कुटुंबातील सदस्यांसोबत आज संध्याकाळी फिरायला बाहेर जाल, याचा तुम्हाला फायदा होईल. आज घरातील सदस्यांशी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. अविवाहित सदस्याबद्दल चर्चा होऊ शकते. कुटुंबासाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल.



आज नशीब 72% तुमच्या बाजूने 
मिथुन राशीच्या या दिवशी कामात एकाग्रता ठेवावी, कारण तसे झाले नाही, तर तुमचे नुकसान होऊ शकते. सतत प्रयत्न केल्यास आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक कार्य करताना मान मिळेल, आणि प्रगती होताना दिसेल. आज तुमच्या कामात काही कलात्मकता दिसून येईल, ज्यामध्ये तुम्हाला उच्च अधिकार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, आज तुम्हाला तुमच्या कामात पूर्ण लक्ष द्यावे लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा आणि गूळ खाऊ घाला.



आज मिथुन राशीचे आरोग्य
आरोग्य चांगले राहील. लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. तुमच्या आहारात तळलेले पदार्थ कमी करून फळांचे प्रमाण वाढवणे चांगले राहील.



मिथुन राशीसाठी आजचे उपाय
मंत्रांसह सूर्यनमस्कार करा आणि दुर्गा सप्तशती पाठ करा. देवी दुर्गेला जास्वंदीचे फूल अर्पण करा.



शुभ रंग : हिरवा
शुभ अंक : 7


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Taurus Horoscope Today 15 February 2023 : वृषभ राशीच्या लोकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, स्वभावात नम्रता ठेवा