Gauri Pujan 2025 : आली गवर आली...रविवारी 'या' शुभ मुहूर्तावर करा गौरी आवाहन; पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...
Gauri Pujan 2025 : दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला ज्येष्ठा गौरी पूजन करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रातील मुख्य सणांपैकी हा एक सण आहे.

Gauri Pujan 2024 : सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2025) धामधूम असतानाच घरोघरी गौराईंचं आगमन होणार आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला ज्येष्ठा गौरी पूजन करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रातील मुख्य सणांपैकी हा एक सण आहे. स्त्रिया अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी हे व्रत करतात.
गौरी पूजन हा सण ज्येष्ठ गौरी पूजन या नावानेही ओळखला जातो, या वर्षी 31 ऑगस्ट 2025 रोजी हा शुभ सण सुरु होईल आणि तो 2 सप्टेंबर 2025 रोजी संपेल.
सोमवार 1 सप्टेंबर 2025 रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीपूजन करावं. तसंच 2 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 51 मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन करावं, असं ज्येष्ठ पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितलं आहे.
गौराईचं आगमन कधी? (When will Gauri arrive?)
रविवार, 31 ऑगस्ट 2025 रोजी घरोघरी गौराईंचं आगमन होणार आहे.
ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त (Jyeshtha Gauri Aavahan Muhurta 2025)
गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर सूर्योदयापासून सायंकाळी 5.27 पर्यंत आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त (Jyeshtha Gauri Pujan Muhurta 2025)
सोमवार, 1 सप्टेंबर 2025 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन होणार आहे. भाद्रपद शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला म्हणजे सोमवारी 1 सप्टेंबर 2025 रोजी गौरी पूजन, नैवेद्य आणि हळदीकुंकू असणार आहे.
ज्येष्ठा गौरी विसर्जन (Jyeshtha Gauri Visarjan 2025)
मंगळवार, 2 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. भाद्रपद शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला म्हणजे, मंगळवारी 2 सप्टेंबरला 2025 रोजी विसर्जन करावे. गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर सूर्योदयापासून रात्री 9:51 पर्यंत गौरी विसर्जन करावे. या दिवशी सात दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे.
ज्येष्ठा गौरी पूजन पद्धत
माता गौरीला शुद्ध पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ स्टूलवर कापड पसरावं, त्यावर गौरी विराजमान कराव्यात. त्यानंतर गौरीला साडी नेसवून सोळा अलंकार केले जातात.
त्यानंतर गौरीच्या कपाळावर हळद, कुंकू आणि अक्षत लावतात. ज्येष्ठा गौरीच्या दिवशी गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एका शुभ मुहूर्तावर केली जाते. नैवेद्याच्या दुसऱ्या दिवशी 16 भाज्या, 16 कोशिंबीर, 16 चटण्या, 16 पदार्थ गौरीला अर्पण केले जातात. यानंतर 16 दिव्यांनी गौरीची आरती करण्याची श्रद्धा आहे.
ओवसा (Ovsa)
अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओवसा भरण्याची पद्धत असते. ओवसा म्हणजे गौरीला ओवाळणं किंवा ओवसणं , ज्याला ववसा असंही म्हटलं जातं. या परंपरेद्वारे घरातील सुनेला मानसन्मान दिला जातो. त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसेही दिले जातात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















