Garud Puran: हिंदू धर्मात गरुड पुराणाला सर्वोच्च धर्मग्रंथ म्हटलं गेलंय. ज्याला विष्णु पुराण असेही म्हणतात. हिंदू धर्मात असे अनेक ग्रंथ आणि धर्मग्रंथ आहेत, ज्यात अनेक गोष्टींचे तपशीलवार वर्णन केले आहे. या गोष्टींच्या माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. यातील एक म्हणजे या पुराणात माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनाविषयी आणि कृतींविषयी सविस्तर लिहिले आहे. विष्णु पुराण वाचणारे किंवा ऐकणारे बरेच लोक मानतात की, मृत्यू येण्यापूर्वी माणसाला काही संकेत दिसू लागतात. गरुडपुराणानुसार जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत...


'या' गोष्टी पाहिल्याने माणसाचा मृत्यू जवळ असतो?


विष्णु पुराणात, व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनाबद्दल आणि कृतींबद्दल सर्व काही तपशीलवार लिहिलेले आहे. असे मानले जाते की मृत्यूनंतर 13 दिवस गरुण पुराणाचे पठण केले पाहिजे. या पुराणामध्ये मृत्यूनंतरची स्थिती, सुखी जीवन, भगवान विष्णूची उपासना, व्रत आणि उत्तम जीवन जगण्याचे नियम सविस्तरपणे सांगितले आहेत. तुम्हाला माहितीय का? गरुड पुराणानुसार काही गोष्टी पाहिल्याने माणसाचा मृत्यू जवळ आहे असा उल्लेख गरुडपुराणात आहे, नेमकं काय म्हटलंय..


स्वत:ची सावली दिसत नाही


गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी माणूस आपली सावली पाहणे बंद करतो. दृष्टी कमजोर होते. मृत्यू जवळ असेल तर अशावेळी व्यक्ती स्वत:ची सावली पाहण्यास असमर्थ ठरते. एखाद्या व्यक्तीची ही गोष्ट मृत्यू दर्शवते.


पूर्वजांचे स्वप्नात सतत येणे


गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी स्वप्नात पितरांना दुःखी किंवा रडताना पाहणे हे मृत्यू जवळ आल्याचे सूचित करते. 


आयुष्यभर केलेल्या कर्मांची आठवण


गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी माणसाला आयुष्यभर केलेल्या कर्मांची आठवण होऊ लागते. त्यांना त्यांची सर्व कामे स्वप्नात दिसू लागतात. हे चांगले किंवा वाईट असू शकते. अशा गोष्टी पाहिल्याने मृत्यू जवळ आल्याचे सूचित होते.


स्वप्नात यमदूताचे रूप


गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्ती स्वप्नात म्हैस किंवा यमदूत पाहू शकते. तुमच्या स्वप्नात तुमच्या सभोवतालच्या काळ्या रंगाची लोक आसपास असल्याचा भास होतो. हे सूचित करते की मृत्यू जवळ आला आहे. 


हेही वाचा>>>


हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )