Ganesh Visarjan 2024 : घरोघरी, मंडळांत लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर आज 10 दिवसांनी गणरायाचं विसर्जन होणार आहे. सनातन धर्मानुसार, अनंत चतुर्दशी (Ganesh Visarjan) तिथीला फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आज विश्वकर्मा पूजा देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास धरतात आणि बाप्पाचं विसर्जन करतात. मात्र, गणपतीचं विसर्जन कराता काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठीच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात.
गणेश विसर्जनाच्या दिवशी काय करु नये?
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना योग्य दिशेची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये गणपतीचं मुख घराच्या दिशेने तर मूर्तीची पाठ घराच्या बाहेर असमं गरजेचं आहे. असं म्हणतात की, गणपतीची मूर्ती घेऊन जाताना जर पाठ घराच्या दिशेने असेल तर दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो.तसेच, घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
- जर, गणेश विसर्जनाच्या दिवशी तुम्ही घरी बाप्पासाठी नैवेद्य तयार करत असाल तर नैवेद्यात लसूण किंवा कांद्याचा वापर करु नका. नैवेद्यात सात्विक भोजनच दाखवा.
- जर तुम्ही घरीच गणपती विसर्जन करणार असाल तर मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर विसर्जनाचं पाणी आणि मूर्तीच्या मातीला फेकून देऊ नका. विसर्जनाच्या पाण्याला तुम्ही झाडा-झुडुपांत टाकू शकता.तसेच, झाडाचं रोप लावताना तुम्ही मातीचा वापर करु शकता.
- गणेश विसर्जनाच्या दिवशी मांसाहारी पदार्थांचं सेवन करु नये. तर, या दिवशी सात्विक भोजनाचं सेवन करावं. अन्यथा देव नाराज होऊ शकतात.
- गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीला वेगाने पाण्यात प्रवाहित करु नका.
- तुळशीची पानं भगवान गणेशाला अर्पण करु नका. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही तुळशीचा नैवेद्य दाखवू नका.
- गणपतीला नैवेद्य दाखवताना चुकूनही या नैवेद्याचा सेवन करु नये.
- या दिवशी कोणाशीच वाद घालू नका तसेच कोणाचं मन दुखवू नका.
- धार्मिक मान्यतेनुसार, कोणत्याही शुभ समारंभाच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करु नये.
गणेश विसर्जनाच्या दिवशी काय करावं?
- गणेश विसर्जनाच्या दिवशी स्नान केल्यानंतर बाप्पासाठी नैवेद्य तयार करा.
- गणेश विसर्जनाच्या आधी श्रद्धेने गणपतीची पूजा करा.
- पूजा करताना मुहूर्ताची काळजी घ्या.
- ज्या उत्साहात गणरायाचं स्वागत केलं त्याच उत्साहात बाप्पाला निरोप द्या.
- गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करताना पूजेच्या वेळी जे साहित्य वापरण्यात आलं त्याचंदेखील विसर्जन करावं.
- पूजेच्या शेवटी प्रार्थना करावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :