Ganesh Visarjan 2024 : आज देशभरात अनंत चतुर्दशीचा (Ganesh Visarjan) उत्सव साजरा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी म्हणतात. 10 दिवस बाप्पाची (Lord Ganesh) सेवा केल्यानंतर आज अखेर बाप्पााला निरोप देण्याची वेळ आली आहे. ज्याप्रमाणे गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी गणरायाची पूजा केली जाते त्याप्रमाणेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाची पूजा करणं शुभ मानलं जातं.
गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त (Ganesh Visarjan 2024 Shubh Muhurta)
आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी 3 शुभ मुहूर्त जुळून आले आहेत. सकाळी 06 वाजून 04 मिनिाटांपासून ते सकाळी 10 वाजून 43 मिनिटांपर्यंत पहिला शुभ मुहूर्त असणार आहे. तर, दुसरा शुभ मुहूर्त दुपारी 12 वाजून 16 मिनिटांपासून ते संध्याकाळी 04 वाजून 54 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, गणेश विसर्जनाचा तिसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी 04 वाजून 55 मिनिटांपासून ते संध्याकाळी 06 वाजून 27 मिनिटांपर्यंत असणार आहे.
'असं' करा गणेश विसर्जन
गणपती विसर्जन करताना विसर्जनाच्या आधी गणपतीची विधीवत पूजा करावी. त्यानंतर त्यांना शेंदूर, अक्षता लावा. तसेच, इलायची, फूल, सुपारी, दुर्वा, पान, नारळ, मध, गुलाल आणि तांदूळ अर्पण करा. देवासमोर धूप, दिवा लावा. तसेच, लाडू, मोदक, केळं यांचा नैवेद्य गणरायाला दाखवा आणि आरती करा.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की, विसर्जन करताना गणेश मूर्तीबरोबर फळ, फूल, वस्त्र तसेच मोदकाची मूठ अर्पण करा. त्याचबरोबर, तांदूळ, गहू, पंचमेवा आणि नाणंसुद्धा द्या.
विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या
गणेश चतुर्दशीच्या दिवशी ढोलताशांच्या गजरात गणरायाचं स्वागत केलं जातं. त्याचप्रमाणे, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाची भव्य मिरवणूक काढून गणपतीचं विसर्जन केलं जातं. मात्र, या दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
- गणरायाचं विस्रजन करण्याआधी देवाकडे आपल्या चुकांची माफी मागा.
- विसर्जनाला जाताना चामड्याचा बेल्ट, घड्याळ तसेच पर्सबरोबर घेऊ नका.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गणपती विसर्जन करताना कधीच बूटं, चपला घालून गणपतीचं विसर्जन करण्याची चूक करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology Panchang 17 September 2024 : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जुळून आला चंद्र मंगळ नवम पंचम योग; 5 राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा